Vasai Crime : वसईत सत्तेचा माज? राजकीय वैमनस्यातून तरुणाला कार्यालयात बोलावून अमानुष मारहाण; भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
Vasai Crime News : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून एका भाजप (BJP) नगरसेवकाने तरुणाला कार्यालयात बोलावून अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Vasai Crime News वसई : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून एका भाजप (BJP) नगरसेवकाने तरुणाला कार्यालयात बोलावून अमानुष मारहाण (Crime News) केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित नगरसेवकासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात वालीव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर वसईच्या (Vasai Crime News) राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचाच अधिक तपास करत आहेत.
Vasai Crime News : राजकीय वैमनस्यातून तरुणाला कार्यालयात बोलावून अमानुष मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव रवि झा असे असून, मारहाण करणाऱ्या नगरसेवकाच नाव गणेश पाटील आहे. तो प्रभाग क्रमांक 18 (अ) चा भाजपचा नगरसेवक आहे. निवडणुकीदरम्यान ‘शिट्टी’ चिन्ह असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेतल्याचा राग मनात धरून त्याला जबरदस्तीने कार्यालयात बोलावण्यात आल्याची तक्रारीत सांगण्यात आलंय. तर कार्यालयात 4 ते 5 जणांच्या उपस्थितीत त्याला लाकडी दांडक्याने पाठीवर आणि पायांवर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Vasai Crime : पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी, भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
इतकेच नव्हे, तर पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी गणेश पाटील याने दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून 'सत्तेचा माज' असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर जखमी रवि झा याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), १८९(२), १९१(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Vasai News : सत्तेचा गैरवापर आणि दडपशाहीच्या आरोपांमुळे वातावरण तापले
दरम्यान, घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्तेचा गैरवापर आणि दडपशाहीच्या आरोपांमुळे वातावरण तापले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून संबंधितांची चौकशी केली जात आहे. 'कायदा सर्वांसाठी समान आहे', असे स्पष्ट करत पोलीस प्रशासनाने निष्पक्ष कारवाईचे आश्वासन दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























