एक्स्प्लोर

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे असलेल्या खात्याची उत्तरं त्या देणार नाहीत, तिन्ही खात्यांची जबाबदारी राष्ट्रवादीतील 'या' दिग्गज मंत्र्यांकडे

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा युवा कल्याण, अल्पसंख्यांक आणि राज्य उत्पादन शुल्क अशी तीन खाती आहेत. त्यावर उत्तर देण्याची जबाबदारी राष्ट्रवादीतील इतर दोन नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या तीनपैकी एकाही खात्याची उत्तरं या अधिवेशनात त्या स्वतः देणार नाहीत. त्यांच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याची उत्तरं देण्याची जबाबदारी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देण्यात आली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं हे पहिलच अधिवेशन आहे. त्यामुळे सभागृहात त्या काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र त्यांच्या खात्याची जबाबदारी आता इतर मंत्र्यांकडे देण्यात आल्याने सुनेत्रा पवार सभागृहात बोलण्याची शक्यता कमी आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेली क्रिडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्यांक खातं तसेच राज्य उत्पादन शुल्क खातं हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलं. तर अर्थखातं हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेलं. 

पार्थ पवार राज्यसभेत जाणार

अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर राज्यसभेत खासदार असलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर राज्यसभेत पार्थ पवार यांना पाठवण्यात येणार आहे. 

मुंढवा घोटाळ्यात पार्थ पवारांना क्लीन चिट?

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या संबंधि नेमण्यात आलेल्या खारगे समितीचा अहवाल याच अधिवेशनात सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर होणार आहे. खारगे समितीचा अहवाल यापूर्वीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंपुढे सादर करण्यात आला आहे. दरम्यान, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान अजित पवारांच्या अपघातानंतर व्हीएसआर विमान कंपनी चांगलीच वादात सापडल्याचं दिसतंय. डीजीसीएनं व्हीएसआरच्या 4 लिअरजेट विमानांना बंदी घातल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही व्हीएसआर विमान न वापरण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंना गळ घातल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिवेशनादरम्यान संजय शिरसाट आणि रोहित पवार आमनेसामने आल्यानंतर रोहित पवारांनी शिरसाटांच्या निर्णयाचं स्वागत केलं. व्हीएसआरची विमानं अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

ही बातमी वाचा:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
Embed widget