एक्स्प्लोर

'ओमायक्रॉन' मुंबईच्या उंबरठ्यावर? हाय रिस्क देशातून आलेले 9 जण कोरोनाबाधित

Mumbai Coronavirus Omicron Update : ओमायक्रॉन मुंबईच्या उंबरठ्यावर? हाय रिस्क देशातून आलेल्या 9 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं निष्पन्न

Mumbai Coronavirus Omicron Update : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं (Omicron) संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली आहे. काल ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाला. कर्नाटकातील दोन जणांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता देशाची चिंता वाढली आहे. अशातच ओमायक्रॉन देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबईत हाय रिस्क देशातून आलेल्या 9 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले असून सध्या त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. 

हाय रिस्क देशांतून 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान, 2868 प्रवासी मुंबईत आले आहेत. त्यापैकी 485 प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 9 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 

जगात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झाल्यापासूनच देशासह राज्यातही सर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अशातच मुंबई महापालिकेनंही ओमायक्रॉनचा धोका ओळखून अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी गाईडलाईन्सही लागू करण्यात आल्या आहेत. 

धक्कादायक! भारतातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचा यंत्रणांना चकवा, दुबईला पळाला

कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण दुबईला (First Omicron patient) पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक जण 66 वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले.  त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. पण जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले. 

दक्षिण आफ्रिकेत पाचपट वेगानं पसरणारा ओमायक्रॉन व्हेरियंट भारतात धडकला आहे. त्यामुळेच देशातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.  गेल्या महिनाभरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व प्रवाशांचं ट्रेसिंग केलं जात आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटबाबत समजल्यानंतर कर्नाटक सरकारनं दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 93 जणांना ट्रॅक केलं. यात दोन जण पॉझिटिव्ह आढळले. ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले आणि त्यात दोन्ही रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आले.  

ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचं कळताच केंद्रानं परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचं विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यानं आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे.

महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स : 

  • 12 ऐवजी केवळ 3 देशांचा हाय रिस्क कंट्रीज मध्ये समावेश
  • साऊथ आफ्रिका, बोट्स्वाना, झिम्बाम्बे हाय रिस्क कंट्रीज
  • हाय रिस्क कंट्री मधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक
  • 7 दिवस संस्थात्मक क्वॉरंटाईन बंधनकारक 
  • इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी लशीच्या दोन डोसचं प्रमाणपत्र बंधनकारक
  • 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा

राज्य सरकारही आता सतर्क

ओमायक्रॉन व्हेरियंट अखेर भारतात धडकल्यामुळे राज्य सरकारही आता सतर्क झालंय. ओमायक्रॉन व्हेरियंट किती घातकी आहे? त्यावर कोविड प्रतिबंधक लस कितपत प्रभावी आहे यावर आता जगभरातील लसनिर्मिती कंपन्यांकडून परीक्षण सुरु आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हातीAnandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पाDhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
Eknath Shinde : कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
Embed widget