एक्स्प्लोर
मंजुळा शेट्ये हत्या : स्वाती साठेंकडून तपास काढला, व्हायरल मेसेजनंतर कारवाई

मुंबई : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी तपास अधिकारी स्वाती साठेंकडून तपास काढून घेतला आहे. पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. स्वाती साठेंनीच आरोपी असलेल्या 6 महिला पोलिसांची पाठराखण केल्याचा आरोप आहे. तशी व्हॉट्स अप पोस्टही समोर आली आहे. साठे यांनी व्हॉट्स अॅप ग्रुपवर आरोपी पोलिसांचं जाहीरपणे समर्थन केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. 'आपण जेलकर्मी अधिकारी आणि कर्मचारी भगिनींना भक्कम आधार देऊ', असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर ठाणे कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर स्वत: स्वाती साठेंनी आपल्याला तपासातून दूर करावं, अशी मागणी करत तसं पत्रच कारागृह प्रशासनाला लिहिलं होतं. त्यानंतर आता साठेंकडून तपास काढून घेतल्याची माहिती आहे. काय आहे नेमकं प्रकरण? भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
संबंधित बातम्या Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण! भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखलआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























