एक्स्प्लोर
मुंबईतील प्रेमवीराचा एक्स गर्लफ्रेण्ड आणि तिच्या बॉयफ्रेण्डवर हल्ला
मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीत तरुणाने एक्स गर्लफ्रेण्ड आणि तिच्या बॉयफ्रेण्डवर हल्ला करुन आत्महत्येचा प्रयत्न केला
मुंबई : मुंबईतील एका प्रेमवीराने आपली एक्स-गर्लफ्रेण्ड आणि तिच्या सध्याच्या बॉयफ्रेण्डवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारात जखमी झालेल्या तिघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीत घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
आरोपी चंद्रकांत साळुंकेचे गेल्या चार वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघंही खासगी कंपनीत कामाला होते. त्यानंतर चंद्रकांत पुण्यातील एका आयटी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरीला लागला, तर संबंधित तरुणी मानखुर्दमधील एका पॅथॉलॉजीत मदतनीस म्हणून काम करत होती.
तरुणीचे तिच्याच ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळले. याची कुणकुण चंद्रकांतला लागताच तो पुण्याहून मुंबईला आला आणि त्याने या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघांनीही त्याचं ऐकून घेतलं नाही.
अखेर चंद्रकांत संध्याकाळी पुन्हा आला आणि त्याने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डला भेटायला बोलावलं. चंद्रकांतने तिच्या गालावर चाकूने सपासप वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून तरुणीचा सध्याचा प्रियकर तिचा जीव वाचवण्यासाठी आला. तेव्हा चंद्रकांतने त्याच्याही मानेवर वार केला.
अखेरीस, चंद्रकांतने स्वतःच्या मानेवरही वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून स्थानिकांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेलं. त्या दोघांची प्रकृती सुधारत असून आरोपीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement