अनुभव, मनोबल कौशल्याची कसोटी पाहणारा मालंगगड सर केला, मुंबईच्या गिर्यारोहकांनी प्रजासत्ताकदिनी फडकवला तिरंगा
शिलाहार राजांनी बांधलेला हा किल्ला लढाईच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उंचीवरून परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उपयोगी होता. गडमाथा गाठण्यासाठी 2.30 ते 3 तासांचा कालावधी लागतो.
Mumbai: गिर्यारोहण हे केवळ छंद नाही तर तो धाडस आणि जिद्दीचा खेळ. मुंबईतील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांच्या टीमने याचा जिवंत अनुभव दिलाय. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत 25 जानेवारीला त्यांनी कल्याणजवळील मलंगगड या आव्हानात्मक गडावर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकवला. वैभव ऐवळे, अमित चव्हाण, सूरज सुतार, निलेश माने आणि अक्षय सिंग यांच्या टीमने हे यश मिळवलं. हा 3200 फूट उंच गड सह्याद्रीतील सर्वात कठीण श्रेणीतील गडांपैकी एक मानला जातो. माथेरान डोंगर रांगेतील मलंगगड उर्फ श्रीमलंगगड हा कल्याणपासून अवघ्या 16 किमी अंतरावर आहे. (Malanggad Adventure) शिलाहार राजांनी बांधलेला हा किल्ला लढाईच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. उंचीवरून परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उपयोगी होता. गडमाथा गाठण्यासाठी 2.30 ते 3 तासांचा कालावधी लागतो. मार्गात अरुंद पाईपसारख्या वाटेवरून चढावे लागते, जिथे मनोबल, शारीरिक ताकद आणि कौशल्यांची कसोटी लागते. (Malanggad Trekking)
मुंबईच्या गिर्यारोहकांची कामगिरी
मुंबईतील समन्वय संस्थेच्या गिर्यारोहकांनी 25 जानेवारी रोजी हा गड सर केला. यानिमित्ताने अमृतमहोत्सव वर्षाची सांगता 75 तिरंग्यांचे तोरण फडकवून करण्यात आली. टीममध्ये वैभव ऐवळे, अमित चव्हाण, सूरज सुतार, निलेश माने आणि अक्षय सिंग यांचा समावेश होता. गेल्या वर्षीही वैभव ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराखंडमधील केदारकंठा शिखर (12500 फूट) सर करून तिथेही 75 तिरंगे फडकवण्यात आले होते. (Republic Day2025)
सह्याद्रीपासून हिमालयापर्यंतचा प्रवास
वैभव ऐवळे यांनी आतापर्यंत सह्याद्रीतील 300 पेक्षा जास्त किल्ले, घाटवाटा आणि सुळके सर केले आहेत. हिमालयातील माउंट किलीमांजारो (आफ्रिका), माउंट एल्ब्रस (युरोप), एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि कालापत्थर यासारख्या जागतिक शिखरांवरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2025 चा प्रजासत्ताक दिवस "स्वर्णिम भारत: विरासत आणि विकास" या थीमसह साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गिर्यारोहकांच्या या कामगिरीने देशाचा गौरव वाढवला आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान पूर्ण झाले पण 26 जानेवारी 1950 ला ते अमलात आणले कारण 26 जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता. 1930 मध्ये याच दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांना पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि तो दिवस स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात असे. त्याच दिवशी संविधान अमलात आणून तो देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो. (Sahyadri Trekkers)
हेही वाचा: