Ajit Pawar: दादा आला की लांबलचक मोठा हार घालायचा, त्याला काय चाटायचंय? अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.अजित पवार हे इंदापूरच्या भिगवनच्या मदनवाडी येथील एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पक्षातील कार्यकर्त्यांना मिश्किल टोला लगावला आहे.
पुणे: नानासाहेब बंडगर हेच 2006 साली माझ्याकडे नोकरी मागण्यासाठी आले होते. त्यावेळी मी म्हणालो होतो की, नोकरी नाही, चांगला व्यवसाय करा. आज या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला. जे नानासाहेब बंडगर स्वतः नोकरी करत होते, आज त्यांच्याकडे दोनशे लोक काम करतात. नाहीतर काही लोकांच्या रानातील गाजर, गवत काढता काढता त्यांच्या नाकी नऊ येतं. पण ते गप्पा मारणार की अरे मोदी साहेब असे म्हणाले, तसे म्हणाले.... अरे तुला करायचंय काय? करतोय काय, असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला आहे.अजित पवार हे इंदापूरच्या भिगवनच्या मदनवाडी येथील एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
बारामतीचे कृषी प्रदर्शन किती लोकांनी बघितलं, असा प्रश्न केल्यावर काही लोकांनी हात वर केले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हे बघा ही खरी माणसं. नाहीतर बाकीचे सगळे पांढरे पुढारी. दादा आला लांबलचक मोठा हार घालायचा. अरे स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या, कुटुंबाबरोबर संध्याकाळी जेवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर सकाळपासून दिवसभर पाठवायचं, काम करायचं अन् मी पुढारी? काय त्याला चाटायचंय. असा सल्ला देत अजित पवारांनी कानउघडणी केली.
...त्याशिवाय आपण टिकणार नाही
मला झाडांची प्रचंड आवड आहे. तुम्ही पूर्वीची बारामती आठवा आणि त्यानंतर मी बारामतीचे नेतृत्व करायला लागलो त्यानंतरची बारामती पहा. पर्यावरणाचा फार मोठं संकट आपल्यावर आहे. पुढे पाऊस पडेल नाही, पडेल. काही पण घडू शकतं. यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करावा लागेल. मातीशिवाय करोड रुपये उत्पादन आपण घेऊ शकतो. राजगुरुनगरने तयार केलेला नवीन कांदा नऊ महिने टिकू शकतो. 86032 आणि 265 एकत्र करून पाडेगाव संशोधन केंद्र नवीन जात काढले आहे. काळानुरुप तुम्हाला आणि मला बदलाव लागेल. त्याशिवाय आपण टिकणार नाही. अकरा रोजगार निर्माण झाले तर एक रोजगार हॉटेल रोजगारातून निर्माण होतोय.असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
लाडक्या बहिणीचे पैसे अजिबात बंद होणार नाहीत
दरम्यान, कुणीतरी चर्चा करत आहे की, लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार. मात्र अजिबात बंद होणार नाहीत. 20,000च्या प्रति महिना आत मध्ये ज्याचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार आहेत. माझ्याकडे तक्रार आलेली आहे बांगलादेशी महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेतले. पण तपासणी सुरू आहे, नाहीतर म्हणाल अजित पवारांनी कबूल केले बांगलादेशच्या महिलांनी पैसे घेतले.
हा काय अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही
इंदापूर न्यायालयाच्या बिल्डिंगच्या स्टाईल पडू नयेत म्हणून खिळे मारले आहेत. मला आतमध्ये जाताना दिसले असते तर या कॉन्टॅक्टरला काळया यादीत टाका असं जाहीर केलं असतं. हे मी खपवून घेणार. हा काय अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही. असा दमही अजित पवारांनी यावेळी दिला आहे.
हे ही वाचा