Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
Virat Kohli : बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार विराट कोहलीचे रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन होत आहे. या नियमांनुसार, राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी सर्व भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल.
Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुढील आठवड्यात अरुण जेटली स्टेडियमवर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे. दिल्लीचा संघ आपल्या शेवटच्या गट सामन्यात रेल्वेशी भिडणार आहे. कोहली तब्बल 13 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने शेवटचा रणजी सामना खेळला होता. कोहलीचा निर्णय बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार होत आहे, ज्यामध्ये सर्व भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे.
10 हजार प्रेक्षकांना मोफत प्रवेश
DDCA ने विराट कोहलीच्या पुनरागमनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. स्टेडियममध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून सुमारे 10,000 प्रेक्षकांसाठी जागा तयार करण्यात येत आहे. नॉर्थ एंड आणि ओल्ड क्लब हाऊस प्रेक्षकांसाठी खुले केले जातील. गरज भासल्यास उर्वरित स्टँडच्या तळमजल्यावरही प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाईल. या सामन्यासाठी कोणतेही तिकीट दिले जाणार नाही, असेही डीडीसीएने जाहीर केले आहे. सर्व प्रेक्षकांना हा सामना विनामूल्य पाहता येणार आहे. कोहली या आठवड्याच्या सुरुवातीला राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार होता. पण मानेच्या दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेतली. मात्र, 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त आहे.
Virat Kohli is working so hard away from crowds with ex batting coach of India..... he is preparing hard for Ranji match & Champions Trophy.....
— Rajiv (@Rajiv1841) January 25, 2025
His close source said he is aiming not just for champions trophy but for ODI WC 2027 & WTC Final 2027❤️❤️pic.twitter.com/iZGGLijyUZ
प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत सामने खेळणे आवश्यक
बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार विराट कोहलीचे रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन होत आहे. या नियमांनुसार, राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी सर्व भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या खराब फलंदाजीनंतर बोर्डाने जारी केलेल्या 10-पॉइंट ऑर्डरचा हा भाग आहे. 36 वर्षीय कोहलीने त्या मालिकेत 190 धावा केल्या, ज्यामध्ये पर्थमधील शतकाचा समावेश होता.
सौराष्ट्रविरुद्धच्या शेवटच्या रणजी सामन्यात दिल्लीला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर दिल्ली ड गटात पाचव्या स्थानावर आहे. रेल्वेने एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. दिल्लीने सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवला आहे. कोहलीच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत होईल आणि त्याच्या चाहत्यांना त्याची जादू पाहण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या