एक्स्प्लोर
उरण ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये भीषण आग, 4 जणांचा मृत्यू
आगीची भीषणता लक्षात घेता प्रशासनाकडून जवळपासच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. जेएनपीटी आणि ओएनजीसी फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहचले असून त्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे.
उरण येथील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन(ओएनजीसी) च्या गॅस प्लांटला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. ओएनजीसी प्लांटमधील ड्रेनेज लाईनला आग लागली होती. संपूर्ण परिसरात आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. लिक्विड लिकेजमुळे आग लागल्याची माहिती सध्या मिळत आहे. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सीआयएसएफच्या 3 जवानांचा तर ओएनजीसीच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
दरम्यान आगीची भीषणता लक्षात घेता प्रशासनाकडून जवळपासच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ओएनजीसी प्रकल्पापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत नागरिकांची ये-जा बंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
