Maharashtra weather Live Updates : येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
Heavy Rain forecast: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर परिसरातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Background
मुंबई: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने राज्यात 6 जूनला प्रवेश केला होता. त्यानंतर रविवारी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले. त्यामुळे काल संध्याकाळपासून मुंबई, ठाणे आणि आजुबाजूच्या परिसरात पावसाला (Heavy Rain in Maharashtra) सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. सोमवारीही मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Maharashtra News : लातूरमध्ये सलग पाचव्या दिवशीही पाऊस
लातूर : मागील पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी सुरु आहे. पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यात पावसानं दररोज जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. रोज संध्याकाळी पावसाला सुरुवात होत आहे. जोरदार वारा, ढगांचा गडगडाट यांच्यासह दररोज पाऊस किमान अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास हजेरी लावत आहे. अवघ्या काही दिवसात वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. पेरणी लायक पाऊस झाला आणि पावसाने काही काळ उघडीप दिली तर पेरणीला वेग येईल... यामुळे बियाणं आणि खत बाजारामध्ये शेतकऱ्यांचा राबता वाढला आहे.
Latur Rain News : पावसाची चाहूल लागल्याने मेंढपाळ गावाकडे निघाले
Latur Rain News : मागील अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, माळशिरस, मान या भागातून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ मेंढ्यांच्या कळपास लातूर भागात येत असतात. यावर्षी मान्सूनपूर्व पावसानं उत्तम साथ दिली आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी आहे. पावसाची चाहूल लागल्याने हे मेंढपाळ आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. जिल्ह्याभरात 300 च्या आसपास मेंढपाळ आपल्या कळपासह लातूर जिल्ह्यात दाखल झाले होते. एका कळपात दीडशे ते दोनशे मेंढ्या असतात. आता हे सर्व मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मागील अनेक वर्षापासून या भागात नेमका येत असतात पावसाला सुरुवात झाली की ते परतीचा प्रवास सुरू करतात. यावर्षी परतीचा प्रवास पावसाने उत्तम साथ दिल्याने काही दिवस अगोदरच सुरू झाली आहे.






















