तिसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग सात दिवसांपर्यंत, विलगीकरणाचा कालावधी कमी होऊ शकतो : डॉ. शिवकुमार उत्तुरे
ओमायक्रॉनचा (Omicron) फैलाव जास्त असला तरी तो फुफ्फुसापर्यंत जात नाही. रुग्ण दगावत नाही असे देखील डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले.
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना निर्बंधही वाढताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे राज्य सरकारने क्वारंटाईन किंवा विलगीकरणात राहण्याचा कालावधी कमी आहे. तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनच्या केस जास्त असल्या तरी रुग्णांना त्रास कमी होतोय. संशोधनानंतर असं आढळलंय की, या व्हेरियंटचा संसर्ग सात दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. सात दिवसांनंतर जंतू संसर्ग वाढत जाणं कमी होते. त्यामुळे विलगीकरणाचा कालावधी कमी करता येऊ शकतो, असे महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलचे डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.
ओमायक्रॉनमुळे त्रास तीन ते चार दिवस होतो
डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, सात दिवसाचा कालावधी कमी झाला आहे. संपूर्ण जगात हा कालावधी कमी केला गेला आहे. साधारण हा कालावधी पाच दिवसांवर आला आहे. आपल्यापेक्षा कमी डॉक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. युरोपात पाच दिवसांनंतर सांगतायत की, कामावर परत या. आपण सात दिवस का म्हणतोय तर आरटीपीसीआर रिपीट करुन घेतली, त्यात ते निगेटीव्ह सापडतात. ते पसरवू शकत नाही. ओमायक्रॉनमुळे त्रास तीन ते चार दिवस होतो. त्यामुळे लोकांना आपण घरीच विलगीकरणात जाण्याचा सल्ला देतो.
लक्षणे नसल्यास तीन दिवसानंतर विलगीकरणातून बाहेर पडता येणार
डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, सरकारनं आणि आयसीएमआरने देखील आता सांगितलं आहे की, जर तुम्हाला तीन दिवसांपेक्षा जास्त लक्षणे नसली. तुम्हाला ताप आणि इतर गोष्टी नसतील तर तुम्ही विलगीकरणातून बाहेर पडता येणार आहे. हा निर्णय आपण सर्वांना लागू करु शकतो. आयसीएमआर पण म्हणतं जे रुग्णालयात दाखल झाले आणि ते तीन दिवसात बरे झाले तर त्यांना घरी पाठवले जातात. घरी विलगीकरणात जात हा कालावधी कमी होऊ शकतो.
ओमायक्रॉनमुळे रुग्ण दगावत नाही
ओमायक्रॉनचा फैलाव जास्त असला तरी तो फुफ्फुसापर्यंत जात नाही. रुग्ण दगावत नाही आहे. अगोदर सीटी स्कॅन करायचे ते आता बंद झाल्याची माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :