एक्स्प्लोर

मुंबई महानगरात प्रत्येक महापालिकेची वेगळी नियमावली, नागरिक संभ्रमात

मुंबईच्या शेजारी ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, निजामपूर या महानगरपालिका आहेत.  पण या प्रत्येक महानगरपालिकेत कोरोना संदर्भात नियम मात्र मुंबईपेक्षा वेगळे आहेत. 

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेने स्वतःची वेगळी नियमावली तयार केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  यामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिका यांचा समावेश आहे. त्यामुळे एकमेकांच्या शेजारी असलेल्या या महापालिकांमध्ये वेगवेगळे नियम का? असा सवाल उपस्थित होतोय. 

दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जाहीर केली. केंद्र सरकारच्या नियमावलीवर आधारित ती नियमावली असली तरी त्यात काही प्रमाणात बदल करण्यात आले.  तर मुंबईच्या शेजारी ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, निजामपूर या महानगरपालिका आहेत.  पण या प्रत्येक महानगरपालिकेत कोरोना संदर्भात नियम मात्र मुंबईपेक्षा वेगळे आहेत. 

मुंबई महापालिका 

मुंबईत  इमारतीत ज्याला कोरोना झाला आहे त्याला सलग 10 दिवस घरीच राहावे लागेल. इमारतीचा मजला सील करणार की नाही याबाबत उल्लेख नाही. एखाद्या इमारतीत 10 नागरिक किंवा 20 टक्के कोरोना रुग्ण असल्यास ती इमारत सील केली जाईल. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क लोकांनी आणि लक्षणे असलेल्या लोकांनी पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचा कोणताही उल्लेख नाही. 

नवी मुंबई महापालिका 

ज्या इमारतीमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित घर सात दिवसांसाठी सील करण्यात येईल. त्याच मजल्यावर एका पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला सील करण्यात येईल. गृह निर्माण संस्थेतील एका इमारतीत 26 पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. गृह निर्माण संस्थेत एका पेक्षा जास्त इमारती असल्यास फक्त कोरोना रुग्ण आढळलेली इमारत सील होईल. सात दिवसांचा विलगिकरण कालावधी संपल्यावरच लावलेले सील काढण्यात येईल. इतकेच नाही तर त्यांनी नियम मोडल्यास दंड लावणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास 10 हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 25 हजारांचा दंड तर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड नवी मुंबई मनपा वसूल करणार आहे. 

 ठाणे 

 ठाणे महापालिकेत ज्या इमारतीतील सदनिकेमध्ये कोविड रुग्ण आहे. ती सदनिका 7 दिवसंकरिता सील  राहणार आहे. ज्याला कोरोना झालाय त्याला सात दिवस घरी थांबावे लागेल. त्या व्यक्तीच्या संपर्कामधील लोकांनी पाचव्या किंवा  सातव्या दिवशी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. तसेच लक्षणे नसतील तरी निकट राहिलेल्या लोकांनी   पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची कोणताही उल्लेख नाही. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेने नियमात आणि दंडाच्या रकमेत देखील बदल केला आहे तर भिवंडी निजामपूर महापालिकेने देखील नियमात थोडे बदल केले आहेत.  ज्यांना कोरोना होतोय त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून उपचार पद्धती जाहीर केली आहे. तिचे पालन सर्वत्र एकाच प्रकारे करण्यात येते मग विलिगीकरणासाठी केंद्राने जी नियमावली दिली आहे तिचे पालन न करता प्रत्येक महापालिका वेगवेगळे नियम का बनवत आहे असा प्रश्न निर्माण होतोय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Embed widget