एक्स्प्लोर

क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देताय? मग आधी या गोष्टी तपासा; BMCकडून टोल फ्री नंबरही जारी

मुंबईमध्ये क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये होणारे वाद पाहता आता बीएमसी प्रशासनानं एक आवाहन केलं आहे. सोबतच एक टोल फ्री नंबरही जारी केला आहे.

मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तिंवर कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल यांना दंडाची रक्कम देण्यापूर्वी, क्लीन अप मार्शलनी गणवेष परिधान केलेला आहे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक नमूद केला आहे, याची खातरजमा करुन नागरिकांनी दंडाची रक्कम भरावी व पावती देखील घ्यावी. याअनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800221916 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 कोविड 19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुखपट्टी अर्थात मास्क लावून वावरणे प्रत्येकास बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास रुपये २०० इतका दंड देखील आकारला जातो. मुंबई महानगरामध्ये कोविड १९ विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढीस लागला आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी विनामुखपट्टी अर्थात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

 जे नागरिक मास्क परिधान करणार नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एक याप्रमाणे खासगी सुरक्षारक्षक क्लीन अप मार्शल संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे क्लीनअप मार्शल गणवेष परिधान केलेले असतात. या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व त्यांचा अनुक्रमांक लिहिलेला असतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा मास्क परिधान न करणे या प्रत्येक उल्लंघनाकरिता रुपये २०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते. त्या दंडाची पावती देखील क्लीनअप मार्शल कडून संबंधित नागरिकास दिली जाते. 

 सबब, मुंबई महानगरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारची कारवाई होत असताना, क्लीनअप मार्शल यांनी गणवेष परिधान केलेला असणे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक असणे, तसेच दंडाची पावती देणे या सर्व बाबी आवश्यक आहेत. 

 संबंधित नागरिकांनी दंडाची रक्कम क्लीनअप मार्शलकडे देण्यापूर्वी या सर्व बाबींची खातरजमा करावी. दंड भरल्यानंतर त्याची पावती आवर्जून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक 1800221916 यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget