Mumbai News : मुंबईत 72 टक्के मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी, पोलीस सूत्रांची माहिती
Mumbai News : मुंबईत 72 टक्क्यांवरील मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : मुंबईत 72 टक्क्यांवरील मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर सकाळची अजाण वेळी मुंबईतली 72 टक्के मशिदींवरील भोंगे बंद असतात, अशीही माहिती समोर आली आहे. तर बहुतांश मशिदींकडून भोंग्यांचा वापर बंद असल्याचीही माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांनी सर्व समाजाच्या नेत्यांसोबत बैठक घेतल्याचीही माहिती दिली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मुद्द्यांबद्दल आणि त्याचे पालन करण्याबद्दल समजावून सांगण्यात आले. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरसाठी पुढील परवानगी संरचनेची सत्यता पाहण्यासाठी आणि ती सायलेंट झोनमध्ये आहे की नाही हे पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी लोकांकडून अर्ज याला सुरुवात झाली आहे.
तर दुसरीकडे नांदेमधील बारड गावानं 2018 मध्येच सर्वानुमते सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले आहेत. भोंग्यांच्या या वादात बारड हे गाव आदर्श ठरलय,कारण ह्या गावाने आज पासून पाच वर्षापूर्वीच म्हणजे 31 जानेवारी 2018 सालीच ह्या गावातील सर्वधर्मीयांच्या निर्णयाने गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे बंद केले आहेत.
भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.
संबंधित बातम्या :