एक्स्प्लोर

Maharashtra : भोंग्यांसंदर्भात पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांनी धोरण ठरवावे; गृहमंत्र्यांचे आदेश

Home Minister Dilip Valse Patil on Loud Speaker : भोंग्यांसदर्भात धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Home Minister Dilip Valse Patil : भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, 'पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.' गृहमंत्र्यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं आहे की, 'कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.' 

राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भोंग्यावरुन राज्यभरात वातावरण तापलं असताना राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गृहखात्याने मोठा निर्णय घेतला  आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी अनिवार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय, भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. 

भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.

मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय

सध्याची परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळए आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येतेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Embed widget