(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सरकारच्या हालचाली; नवे सॉफ्टवेअर तयार करण्याचे आदेश
राज्यातील शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी MKCL ला नवे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई : शिक्षकांच्या बदल्या करण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे. पूर्वी बदल्यासाठीचे सॉफ्टवेअर बदलून नवे सॉफ्टवेअर तयार करण्याचे आदेश पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पूर्वी 4 मे ला कोविडमुळे कोणत्याही बदल्या करू नयेत, असे आदेश देण्यात आले होते. हे जुने आदेश बदलले जाण्याचा अंदाज आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक बदल्यांबाबत ग्राम विकास विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली होती. चार फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार हा अभ्यासगट गठीत करण्यात आलेला होता. अभ्यासगटाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या विषयी सुधारित घोरण निश्चित करण्याबाबत चर्चा करुन MKCL यांचेद्वारे बदली बाबतचे संगणकीय प्रणाली (Software) तयार करावे असा निर्णय घेण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांनी मिळवली नोकरी, 32 वर्ष शासनाला गंडवलं, सोलापुरातील शिक्षकाचा प्रताप
नवे सॉफ्टवेअर तयार करण्याच्या सूचना संपूर्ण राज्यात कोविड- 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमिवर चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची बदली करण्यात येऊ नये, असे आदेश वित्त विभागाने दिनांक चार मे ला दिले होते. पण बदली संदर्भातले निंर्बध भविष्यात उठविला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या बदली संदर्भात संपूर्ण तयारी असणे आवश्यक आहे. त्यास अनुसरुन पाच जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना संगणकीय बदली प्रक्रिया करण्यासाठी संगणकीय प्रणाली (Software) MKCL यांच्याद्वारे तातडीने तयार करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक असणारा खर्च जिल्हा परिषद, पुणे यांनी करायचा आहे. यासाठी अतिरिक्त अनुदानाची आवश्यकता असल्यास सविस्तर प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. संगणकीय प्रणाली (Software) तयार झाल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक मंत्री ग्राम विकास मंत्र्यांना दाखविण्यात येणार आहे.
Riksha-Taxi | रिक्षा,टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती