Lalbaug Accident: लालबाग अपघातामुळे प्रेमकहाणी अधुरी राहिली, मद्यधुंद दत्ता शिंदेमुळे दोघांचं लग्नाचं स्वप्न अपूर्ण, संसाराचं स्वप्न होण्यापूर्वीच डाव उधळला
Lalbaug Accident: दारूच्या नशेत असणाऱ्या एका प्रवाशामुळे रविवारी मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये एका बेस्ट बसचा अपघात झाला. ज्यामध्ये नुपुरा मणियार या 28 वर्षीय तरुणीनं आपला नाहक जीव गमावला.
Lalbaug Accident Latest Updates : मुंबई, लालबाग : दारू... ही अशी नशा आहे, ज्यामुळे आजवर अनेक अपघात घडले. अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. त्याच दारूच्या नशेत असणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाच्या मग्रुरीमुळे रविवारी लालबागमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 9 जण गंभीर जखमी झाले. इतरांवर उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला. पण, मद्यधुंद प्रवाशाच्या चुकीची शिक्षा लालबागमधील चिंचपोकळीत राहणाऱ्या एका तरुणीला चुकवावी लागली आहे. 28 वर्षांच्या घरातील कर्त्याधर्त्या नुपुरा हिच्या मृत्यूमुळे मणियार कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
दारूच्या नशेत असणाऱ्या एका प्रवाशामुळे रविवारी मुंबईतल्या (Mumbai Crime) लालबाग (Lalbaug Accident) परिसरामध्ये एका बेस्ट बसचा अपघात (BEST Bus Accident) झाला. ज्यामध्ये नुपुरा मणियार (Nupura Maniyar) या 28 वर्षीय तरुणीनं आपला नाहक जीव गमावला. कोरोना काळात तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हापासूनच नुपुरानं आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. नुपुरा चिंचपोकळीमधील मुक्ताई बिल्डिंगमध्ये आपली आई आणि लहान बहिणीसोबत राहत होती. या घटनेमुळे संपूर्ण लालबागमध्ये शोककळा पसरली आहे.
नुपुरासोबतच तिचा जोडीदारही अपघातात जखमी
कोरोना काळात वडिलांचं निधन झाल्यानंतर नुपुरा अनुकंपावर त्यांच्याच जागी आयकर खात्यात साधारणतः दोन महिन्यांपूर्वी रुजू झाली होती. ती आयकर विभागात लिपिक पदावर कामाला होती. इमाने, इतबारे नुपूरा काम करून आपली आई आणि लहान बहीणीची जबाबदारी पार पाडत होती. पण, अनेक स्वप्न अपूर्ण ठेवून नुपुरानं जगातून एग्झिट घेतली आहे. दिवाळीत नुपुरा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार होती. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी नुपुरा मणियार आपल्या जोडीदारासोबतच खरेदीसाठी लालबागमध्ये आली होती. पण, काळानं घात केला. मद्यधुंद दत्ता शिंदेमुळे अनियंत्रित झालेल्या बेस्ट बसनं नुपुराचा बळी घेतला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नुपुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. नुपुरासोबतच तिचा जोडीदारही या अपघातात जखमी झालेला. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी नुपुराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मद्यधुंद दत्ता शिंदेमुळे तरुणीनं नाहक जीव गमावला
ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत लालबागमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला. रविवार, 1 ऑगस्ट म्हणजे, गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार. लालबागमध्ये प्रचंड लगबग, एकीकडे अनेक मंडळांचे आगमन सोहळे, तर दुसरीकडे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. अशातच बेस्टची 66 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस आली. ही बस राण लक्ष्मीबाई चौक, सायन येथून बॅलार्ड पियरच्या दिशेनं जात होती. बस गणेश टॉकीजजवळ पोहोचली. याच बसमधून मद्यधुंद दत्ता शिंदे प्रवास करत होता. हा सुद्धा लालबागकरच. आरोपी दत्ता शिंदेला गणेश टॉकीजच्या सिग्नलजवळ उतरायचं होतं. त्यानं ड्रायव्हरला तसं सांगितलं, पण ड्रायव्हरनं काही बस थांबवली नाही. त्यामुळे संतापलेल्या मद्यधुंद दत्ता शिंदेनं ड्रायव्हरसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं रागाच्या भरात ड्रायव्हरची कॉलर पकडली आणि त्याच्या पाठीत बुक्की मारली. त्यासोबतच ड्रायवरच्या हाताला हिसका दिला. ड्रायव्हरचं स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि अनर्थ घडला. परिणामी मद्यधुंद दत्ता शिंदेच्या चुकीमुळे नुपुराचा नाहक बळी गेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :