(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
पहिला भारत-बांगलादेश कसोटी सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार असून पावसाच्या अंदाजाने क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यताय.
IND vs BAN: जगभरातील क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या खेळाडूंना चेन्नईत मैदानात पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. काही महिन्यांच्या व्यस्त सामन्यांनंतर गुरुवारी १९ सप्टेंबरला चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रीडासंकुलात 'रेड बॉल ॲक्शन' सुरु करतील. प्रदीर्घ काळानंतर या दोन संघांमध्ये सामना होणार असून पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या असून सप्टेंबरच्या हवामान अंदाजामुळे पावसाचा पहिल्या दिवसाच्या खेळावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Accuweather नुसार IND vs BAN कसोट सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा अंदाज असून सकाळी २५ टक्के पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे. तर दुपारी ४६ टक्के पावसाची शक्यता असल्यानं चेन्नईत अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं धाकधुक वाढली आहे.
भारतासाठी IND vs BAN सामना महत्वाचा
गुरुवारी चेन्नई येथे दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारत बांगलादेशचा सामना करणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आणि गौतम गंभीरने भारताचे प्रशिक्षणपद स्विकारल्यानंतर भारताची ही पहिली कसोटी मालिका असेल. भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये होणारा हा सामना सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष संघाच्या खेळाडूंवरच नाही तर नव्या नेतृत्वावरही आहे.
पावसानं क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होणार?
IND vs BAN होणाऱ्या सामन्यावर मान्सूनचे सावट घोंगावत असून AccuWeather वरील हवामान अंदाजानुसार, पावसाची शक्यता असल्यानं मॅच वॉशआऊट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारून 45 टक्के पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज देण्यात आल्यानंतर क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होणार की पावसाची शक्यता धुसर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारताचं स्थान मजबूत करण्याची चांगली संधी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 टेबलमध्ये भारत आधीच अव्वल असताना, बांगलादेशविरुद्धची आगामी मालिका त्यांच्यासाठी या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी त्यांचे पहिले स्थान मजबूत करण्याची आणि कसोटी सामन्यांच्या जवळ जाण्याची संधी आहे. चेन्नईमध्ये काळ्या आणि लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत, परंतु पीटीआयच्या वृत्तानुसार , पहिला भारत-बांगलादेश कसोटी सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाईल. लाल मातीची खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना उत्तम कॅरी आणि बाउन्स देते, परंतु वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करते. सध्या चेन्नईमध्ये दिवसा ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असताना ते विलक्षण गरम आहे आणि याचा अर्थ, खेळपट्टी फुटेल आणि सामना पुढे जात असताना फिरकीपटूंना मदत करेल.
हेही वाचा:
Ind vs Ban 1st Test : कधी, कुठे अन् फ्री कसा पाहू शकता पहिला कसोटी सामना? जाणून घ्या सर्व काही