Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
Lebanon Radio Blast : हिजबुल्लाह या संघटनेकडून वापर केल्या जाणाऱ्या पेजरमध्ये स्फोट झाला होता. त्यानंतर आता वॉकी टॉकीमध्ये देखील स्फोट झाल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या पेजरचे स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. ती घटना मंगळवारी घडली होती. त्यानंतर आज राजधानी बेरुतमध्ये दोन स्फोट झाले. हे स्फोट वॉकी टॉकीमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावरील माहिती नुसार यावेळी लॅपटॉप, वॉकी टॉकी आणि मोबाईलमध्ये ब्लास्ट झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाहकडून वापरल्या जाणाऱ्या वॉकी टॉकीमध्ये देशातील दक्षिण भागात आणि राजधानीच्या दक्षिणेतील उपनगरांमध्ये स्फोट झाले आहेत. रिपोर्टनुसार काल एक स्फोट झाला होता. त्या घटनेतील मृतांवर जिथं अंत्यसंस्कार करण्यात येणार होते त्या जागेजवळ वॉकी टॉकीचा स्फोट झाल्याची माहिती आहे. मंगळवारी झालेल्या पेजर स्फोटात 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती होती. तर, 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हदथ टीव्हीच्या रिपोर्टनुसार लेबनॉनमध्ये झालेल्या वॉकी टॉकी स्फोटात 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
तीन जणांचा मृत्यू
रायटर्सच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाह या संघटनेनं वॉकी टॉकीची खरेदी 5 महिन्यांपूर्वी केली होती. त्याचवेळी पेजरची खरेदी करण्यात आली होती. वॉकी टॉकीच्या स्फोटानं तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाहनं या घटनांमागे इस्त्रायलचा हात असल्याचा आरो केला होता आणि पलटवार करण्याचा इशारा दिला आहे.
हिजबुल्लाहनं बुधवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायलच्या सैन्य दलाच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. पेजर हल्ल्यानंतर लेबनॉनचा हा पहिला हल्ला होता. पेजर स्फोटानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यातील वादानं या ठिकाणी पहिल्यापासून तणाव निर्माण झालेला आहे.
दरम्यान,हिजबुल्लाह हा लेबनॉन मधील मोठा दहशतवादी गट आहे, जवळपास 1 लाख सैन्य असल्याचा त्यांचा दावा आहे. हिजबुल्लाला उद्देश इस्त्रायलचा नाश करायचा असा आहे.हिजबुल्लाला उघड इराणची मदत असते, कदाचित इस्त्रायलं त्यांना तुम्ही जे करता त्यापेक्षा अधिक चांगलं आम्ही करु शकतो यासाठी ही चुणूक दाखवली असावी, असं म्हटलं जात आहे.
इतर बातम्या :