एक्स्प्लोर

MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर

आमदार अमोल मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

MNS Activist Jay Malokar Death Case : अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. 

30 जुलै रोजी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांचा राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. जय हा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तसेच परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. 

मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. जयच्या मृत्यूनंतर राज आणि अमित ठाकरे यांनी अकोल्यात त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. कुटूंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे मालोकार कुटूंबियांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटले आहे. 

काय म्हटलं आहे जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात?

  • जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. 
  • छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. 
  • डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. 
  • मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा
  • या सर्व गोष्टींमुळे 'न्यूरोजनिक शॉक'मुळे मृत्यू

राज ठाकरे जय मालोकारच्या कुटुंबीयांच्या भेटीला

जय मालोकारच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले होते. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटनात्मक आढाव्यासाठी राज ठाकरे अकोला दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. अमित ठाकरे यांनी 1 ऑगस्टला त्यांच्या निंबी मालोकार गावात जात भेट घेतली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTVABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 23 January 2025Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Embed widget