एक्स्प्लोर
कोकणातील हापूस आंब्याच्या नावे कर्नाटकातील आंब्याची विक्री
कोकणातील हापूस आंबा 300 ते 800 रुपये डझन आणि कर्नाटक हापूस 100 ते 150 रुपये किलो आहे. जादा पैसे कमविण्यासाठी गाडी किरकोळ व्यापाऱ्यांकडून फसवेगिरी केली जात आहे.

नवी मुंबई : बाजारात आता हापूस आंबा दाखल झाला आहे. मात्र इथेही ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने कर्नाटकातील हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सध्या हापूस आंब्याच्या आवकीत वाढ झाली आहे. दररोज 60 ते 65 हजार पेट्या दाखल होत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात कोकणातील हापूस आंब्याला कर्नाटकमधील हापूस आंब्याने टक्कर द्यायला सुरवात केली आहे. सध्या एपीएमसीमध्ये 10 ते 15 हजार पेट्या या कर्नाटक हापूस आंब्याच्या येत आहेत. कर्नाटक हापूस हा रस्त्यावर विकताना कोकणातील हापूस असल्याचा दाखवला जातो. प्रथमदर्शनी कोकण आणि कर्नाटक हापूस आंब्यातील फरक पटकन दिसून येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. हातगाडीवर, रस्त्यावर विकताना कोकणातील हापूसच्या जागी कर्नाटकमधील हापूस गळ्यात मारला जात आहे. कोकणातील हापूस डझनावर तर कर्नाटकमधील हापूस किलोवर विकला जात आहे. कोकणातील हापूस आंबा 300 ते 800 रुपये डझन आणि कर्नाटक हापूस 100 ते 150 रुपये किलो आहे. जादा पैसे कमविण्यासाठी गाडी किरकोळ व्यापार्यांकडून फसवेगिरी केली जात आहे. कोकणातील हापूस आणि कर्नाटकातील हापूसमधील फरक कसा ओळखायचा? कोकणातील हापूस - आंब्याची वरची साल पातळ असते. दिसायला गोल असतो. कापल्यावर केसरी रंगाचा दिसतो. कर्नाटकमधील हापूस - वरची साल जाड असते. दिसायला खालच्या बाजूला निमूळता असतो. कापल्यावर पिवळा रंगाचा दिसतो.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















