एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील अस्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये कल्याण, एलटीटी, ठाणे
कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे ही भारतातील टॉप टेन अस्वच्छ रेल्वे स्टेशन्सपैकी एक ठरली आहेत.
मुंबई : देशातील सर्वाधिक अस्वच्छ दहा रेल्वे स्थानकांच्या यादीत मुंबईतील तीन स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे ही भारतातील टॉप टेन अस्वच्छ रेल्वे स्टेशन्सपैकी एक आहेत.
भारतीय रेल्वेकडून 11 ते 17 मे या कालावधीत रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेबाबत सर्व्हे करण्यात आला होता. अस्वच्छ स्थानकांमध्ये उत्तर प्रदेशातील कानपूर रेल्वे स्थानकाचा पहिला क्रमांक लागतो. कल्याण तिसऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस पाचव्या, तर ठाणे आठव्या स्थानावर आहे.
मुंबईतील कल्याण, एलटीटी आणि ठाणे या मध्य रेल्वेवरील तिन्ही स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कल्याण स्थानकातून दररोज दोन लाख 15 हजार प्रवासी प्रवास करतात. 90 लांब पल्ल्याच्या आणि 572 लोकल गाड्या दररोज या स्थानकावर थांबतात. जवळपास 59 टक्के प्रवाशांनी कल्याण स्थानकाच्या अस्वच्छतेबद्धल नाराजी व्यक्त केली आहे.
एलटीटी आणि ठाणे स्थानकांच्या बाबतीत हे प्रमाण जवळपास 56 टक्के एवढं आहे. एलटीटी स्थानकावर दररोज 50 हजार प्रवाशांची ये-जा होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement