एक्स्प्लोर

निरंजन डावखरेंच्या भाजपप्रवेशाची 'इन्साईड स्टोरी'

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पण त्यांच्या प्रवेशामागील कहाणी तितकीच रंजक आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पण त्यांच्या प्रवेशामागील कहाणी तितकीच रंजक आहे. ठाण्याच्या राजकारणात वसंत डावखरे हे मोठं नाव होतं. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. त्यामुळे सर्व निवडणुकांमध्ये डावखरेंना फायदा होत असे. निरंजन हे वसंत डावखरेंचे पुत्र. स्थानिक राजकारणात जितेंद्र आव्हाडांमुळे डावखरे पिता पुत्र नाराज होते. 6 जून 2016 रोजी विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडले. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाने मदत न केल्यामुळे वसंत डावखरे बिथरले होते. याबाबत त्यांनी अनेकवेळा पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पवारांनी फोन करुन कान टोचल्यावर गोष्टी तात्पुरत्या शांत होत होत्या. पण नंतर पुन्हा तेच राजकारण सुरु व्हायचं. विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडल्यानंतर त्यांची तब्येत ढासळली होती. पक्षश्रेष्ठी पक्षातील लोकांना अडवत नाहीत, मग माझ्या पाठी माझ्या मुलाला कसं वागवतील, ही चिंता वसंत डावखरे यांना होती. वसंत डावखरे हयात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डावखरे यांच्यात तीन बैठका झाल्या. शेवटच्या क्षणी डावखरे रुग्णालयात असताना मुख्यमंत्री त्यांना भेटले, तेव्हा पुढची निवडणूक निरंजन डावखरे भाजपमधून लढवणार, असं ठरलं. जर वसंत डावखरेंना राष्ट्रवादीमधील लोक पाडू शकतात, तर वसंत डावखरेंनंतर निरंजनला पाडणं कठीण नव्हतं. 4 जानेवारी 2018 रोजी वसंत डावखरे निधन झालं. निरंजन यांना राष्ट्रवादीमध्ये कोणी वाली उरला नाही.
राष्ट्रवादीला धक्का, निरंजन डावखरे भाजपत!
वडिलांच्या मृत्यूनंतर सतत अपमान, अपमानास्पद वागणूक यामुळे निरंजन त्रस्त होते. शरद पवार आणि अजित पवारांकडे दाद मागितल्यानंतरही गोष्टी थांबल्या नाहीत. वसंत डावखरेंसोबत वाद होते, पण त्यांच्यानंतर किमान मुलाला तरी टार्गेट करायला नको, असं राष्ट्रवादीतील नेत्यांना वाटत होतं. पण कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे निरंजन यांनी सगळ्या आशा सोडल्या. पदवीधर निवडणुकीबाबत निरंजन डावखरे यांची चर्चा मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही झाली होती. त्यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, पण पदवीधरसाठी शिवसेनेची विशेष तयारी नव्हती. याउलट पदवीधरसाठी मतदारांची नोंदणी भाजपने नीट केली आहे आणि निरंजन यांनीही तयारी केली होती. राष्ट्रवादीतून विशेष मदत मिळणार नाही, उलट निवडणुकीत पाडू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निरंजन हे प्रसाद लाड यांच्याही संपर्कात होते. राजीनामा देतानाही शरद पवार आणि अजित पवार यांनी निरंजन यांना थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण निवडणुकीत पक्षांतर्गत वादाला सामोरं जावं लागेल, मदत मिळणार नाही आणि पूर्वानुभव पाहता निरंजन यांनी राजीनामा दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget