एक्स्प्लोर

माहुलवासिय नरकयातना भोगत आहेत, सुरक्षित ठिकाणी स्थलांतराशिवाय पर्याय नसल्याचा आयआयटी मुंबईचा अहवाल

स्थलांतरित झाल्यापासून त्यांच्या जीवनमानावर मोठा फरक पडला असून त्यांच्या सरासरी उत्पन्नात थेट 30 टक्क्यांनी घट झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. दळणवळणाच्या दृष्टीनं हा परीसर मुख्य शहरापासूनही तसा लांबच आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईनं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात माहुलवासियांच्या हालअपेष्टांची यादीच आपल्या अंतिम अहवालातून सादर केली आहे. तसेच या सर्वांची तातडीनं सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करणं हाच एकमेव पर्याय असल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र यासंदर्भात हात वर करणाऱ्या राज्य सरकारनं अजूनही आपण याबाबतीत कोणतीही नुकसानभरपाई, भाडं अथवा पर्यायी व्यवस्था करण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं आहे. यावर राज्य सरकारला आयआयटीच्या या अहवालावर उत्तर देण्याचे निर्देश देत हायकोर्टानं पुढील बुधवारपर्यंत यासंदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे. प्रदुषण ही माहुलवासियांची सर्वात मोठी समस्या आहे. आयआयटीनं केलेल्या सर्व्हेतून 80 टक्के लोकांनी आपल्याला झालेल्या नव्या आजारांचं कारण डॉक्टरांनी प्रदूषण हेच असल्याचं सांगितलं आहे. मात्र मुलभूत नागरी सुविधांचीही इथं वानवा असल्याचं या अहवालातून स्पष्ट होतंय. इथं स्थलांतरित झाल्यापासून त्यांच्या जीवनमानावर मोठा फरक पडला असून त्यांच्या सरासरी उत्पन्नात थेट 30 टक्क्यांनी घट झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. दळणवळणाच्या दृष्टीनं हा परीसर मुख्य शहरापासूनही तसा लांबच आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी, रेशन दुकान, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सांडपाण्याचं नियोजन, सार्वजनिक दवाखाने, पालिका शाळा या गोष्टी इथं तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात अशी शिफारस आयआयटीनं केली आहे. माहुलच्या आंदोलकांना सीएसएमटीवर झोपण्याची वेळ | मुंबई | एबीपी माझा पाईपलाईनवरील लोकांच्या पुनर्वसनासाठी हरीत लवादानं अयोग्य ठरवलेल्या माहुलला पर्याय काय? असा प्रश्न हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय. घाटकोपरनजीक पाईपलाईनच्या परिसरात घरं गमावलेल्यांना माहुलशिवाय पर्याय नाही अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. मात्र प्रदूषणाच्या मुद्यावरून इथल्या रहिवाश्यांनी माहूल ऐवजी इतरत्र घरं देण्याची मागणी करत हायकोर्टात धाव घेतलीय. तानसा पाईपलाईन लगत उभारण्यात आलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात अपयशी ठरणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईत बेघर होणाऱ्या 6 हजार निर्वासितांच्या पुनर्वसनाचं काय? असा सवाल विचारत स्थानिक लोकांचा विरोध असतानाही त्यांना स्थलांतराच्या नावाखाली जबरदस्तीने माहुल येथे राहण्यास का पाठवले जात आहे? असा सवाल करत अधिकार असतानाही सरकार त्या संदर्भातील धोरण का ठरवत नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती करत हायकोर्टाने राज्य सरकारला वारंवार खडसावले आहे. या संदर्भात दाखल विविध जनहित याचिकांवर हायकोर्टात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. माहुल प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन 53व्या दिवशीही सुरुच | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget