एक्स्प्लोर
संपात सहभागी न झालेल्या ओला चालकाला मारहाण
मुंबई : विविध मागण्यांसाठी मागील आठवड्याभरापासून ओला, उबेर कॅब चालकांचा मुंबईत संप सुरू आहे. या आंदोलनाला आता गालबोट लागण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातून मुंबईत भाडे घेऊन आलेल्या पुण्यातील एका ओला चालकाला भांडूप येथे संपात सहभागी झालेल्या काही ओला-उबेरच्या चालकांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संताजी पाटील असे मारहाण झालेल्या ओला चालकाचे नाव आहे.

26 तारखेला संताजी पाटील हा ओला चालक मुंबईत प्रवासी सोडण्यास आला होता. यावेळी मुंबईत आंदोलन करीत असलेल्या चालकांच्या शकलीत तो फसला. हे आंदोलक स्वतः ओला-उबेर ची बुकिंग करुन, जी गाडी येईल तिच्या चालकांना मारहाण करीत होते. अशाच प्रकारे पुण्यावरून मुंबईत आलेल्या संताजी यांना देखील त्यांनी गाठले. त्यांना भांडूपच्या अमरनगर भागात एका कार्यालयात घेऊन जाऊन तिथे त्याला हाताने आणि पट्ट्यांनी मारहाण करण्यात आली. एवढेच कमी की काय त्याला कपडे उतरवून उठाबशा देखील काढायला लावल्या.
या मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात आला. दरम्यान संपात सामील न होणाऱ्या चालकांची अशीच अवस्था करू, असा संदेश देऊन हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. या मारहाणीप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. भाऊसाहेब ससाणे, आश मोहम्मद शहा, अशोक शर्मा आणि अमन शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement