(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rain | मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे सायन, दादर, वडाळा, माटुंगा, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
पहाटेपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे सायन, दादर, वडाळा, माटुंगा, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील वाहतूक मोठा परिणाम झाला होता. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.Heavy to very heavy rainfall in the suburbs in last 24 Hrs at 7 am, stations reporting rainfall 150-180 mm rainfall in suburbs. City side around 50 - 100 mm. Santacruz 192 mm Colaba 73 mm Heavy showers in the early morning hrs are on in Suburbs and to continue. Please TC pic.twitter.com/C2NIqgzUee
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2019
राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. आपल्या परिसरातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्यातील मुख्याध्यापक घेऊ शकतात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.As per IMD forecast received at 2 am, intermittent rain with heavy to very heavy rainfall at a few places expected in the city and suburbs #MumbaiRainsLiveUpdates #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 27, 2019
बदलापूर जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली अंबरनाथ, बदलापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वांगणीदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून 2 फूट पाणी ट्रॅकवर साचले आहे. एनडीआरएफला मध्य रेल्वेने पाचरण केले असून अनेक लोक गाडीत अडकले आहेत. आसपासच्या सामाजिक संस्थांना मदत करण्याचे मध्य रेल्वेने आवाहन केले आहे.Reviewed heavy rainfall situation at all parts of state,considering local rainfall situation concerned Headmaster /principal can take decision for declaring holiday to schools at their level for Saturday 27/7/2019 !
— ashish shelar (@ShelarAshish) July 26, 2019
These are some pictures as the passengers were being rescued from site. #MumbaiRainsLiveUpdates pic.twitter.com/zHiju7pECA
— Central Railway (@Central_Railway) July 27, 2019