एक्स्प्लोर
डोंबिवलीत सत्तेत असलेल्या शिवसेनेची राडेबाजी, फेरीवाल्यांची दुकानं उद्ध्वस्त
डोंबिवली: डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा युवासैनिकांना फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले आहेत. त्यामुळे स्टेशनला ये-जा करण्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होते. अखेर आज युवासैनिकांनी सेना स्टाईल आंदोलन करत फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस केली.
दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखील आज हे आंदोलन करण्यात आलं. ‘गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवलीतील स्टेशन परिसरात फेरीवाले बसतात. यासंबंधी वांरवार पालिकेशी संपर्क साधून देखील कोणतीही कारवाई होतं नसल्यानं आम्हाला हे पाऊल आज उचलावं लागलं.’ असं दीपेश म्हात्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. याचवेळी त्यांनी या भागातील मनसे नगरसेवक आणि पालिका अधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही केला.
खरं, तर गेल्या 20 वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. पण तरीही शिवसैनिकांना फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सत्ता असून काही उपयोग होत नाही का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement