एक्स्प्लोर
ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावर लोकलचा खोळंबा

मुंबईः ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांना लोकलच्या खोळब्याला सामोरं जावं लागतंय. हार्बर मार्गावर रुळाला तडे गेल्याने कुर्ला ते टिळकनगरदरम्यान लोकल खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे ट्रानहार्बर आणि मध्य रेल्वेवरही लोकल उशीराने धावत आहेत.
ट्रान्सहार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल 15-20 मिनिट उशीराने धावत आहेत. शिवाय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरही लोकल 10-15 मिनिटे उशीराने धावत आहेत. यामुळे सर्वच स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे.
मुंबईत सकाळपासूनच संततधार पाऊस सुरु आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर इकडे लोकलचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement























