एक्स्प्लोर
मंत्रालयावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा, शिक्षक संघटनाही सहभागी
शिक्षकांच्या 91 संघटनांनीही पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होण्याचं ठरवलं आहे.

फाईल फोटो
मुंबई : सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या महामोर्चात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल 2 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. शिक्षकांच्या 91 संघटनांनीही पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होण्याचं ठरवलं आहे. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी याबाबत माहिती दिली. दुसरीकडे बारावीच्या परीक्षा सुरु होण्याच्या तोंडावर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनीही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागणार आहे. सरकार हा प्रश्न कसं सोडवतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























