एक्स्प्लोर

मुंबईतील 21 एकरचा भूखंड अदानींना गिफ्ट, शासनाचा GR निघाला; काँग्रेसचा आरोप, कडाडून विरोध

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानींवर (Gautam Adani) मेहरबान असून अदानींसाठीच सत्ता राबवली जात असल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने सर्व नियम, कायदे, अटी ह्या अदानीचा फायदा पाहूनच बनवले आहेत. भाजपा सरकारने आता धारावी (Dharavi) प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची 21 एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचे सरकारी फर्मान काढले आहे. कोणतीही टेंडर प्रक्रीया न राबवता कोट्यवधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका भाजपा सरकारने घेतलेली आहे. जी जमीन सरकारी आहे, ती जमीन अदानींची असा प्रकार सुरु आहे. भाजपा सरकारने अदानींसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकरांचा हक्क मारण्याचा कट रचला. नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी व पूर्वी जकात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला. आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे. कोणालाही विश्वासात न घेता, कुठलीही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदानींच्या घशात घातला जात आहे. परंतु धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

हा भूखंड देण्याचा शासन आदेश निघाला

मदर डेअरीने पूर्वी वापरलेल्या कुर्लाच्या भूखंडावर 800 ते 900 मौल्यवान झाडे आहेत,  ज्यांच्यामुळे इथला परिसर हा पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. पण या झाडांची निर्दयीपणे कत्तल करून या इको-सेन्सिटिव्ह भूखंडच्या मुद्रीकरणाचे मनसुबे महाभ्रष्टयुती सरकारचे आहेत. यापूर्वी भाजपच्याच एका उच्चपदस्थ नेत्याचा डोळा या भूखंडावर पडला होता आणि या जागी औद्योगिक संकुल उभारण्याचा खेळ मांडला होता. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परम मित्र अदानींची नजर या भूखंडावर पडली आहे. एकनाथ शिंदेंच्या पूर्वीच्या आदेशांना केराची टोपली दाखवत महसूल व दुग्धविकास विभागाने ही जागा अदानीच्या DRPPL ला भेट देण्याचा GR काढला आहे.काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून एकाही धारावीकराला विस्थापित होऊ देणार नाही, प्रत्येक धारावीकराचे पुनवर्सन धारावीतच झाले पाहिजे. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही अशी आमची भूमिका असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. 

भाजपचा डोळा भूखंडाच्या श्रीखंडावर

भाजपाला पर्यावरणाशी, लोकांच्या हक्कांशी काही देणेघेणे नाही, या सगळ्यांचा डोळा भूखंडावरील श्रीखंड खाण्यावर आहे. पण आम्ही तसे हाऊ देणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व इथल्या रहिवाशांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी इथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी एक लोकचळवळ निर्माण केली आहे. या मागणीला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Embed widget