(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवघ्या चार हजार रुपयांसाठी मित्राची हत्या, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
लोकसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी, 26 एप्रिल रोजी पोलिसांना दिवा पनवेल रेल्वेमार्गावर एक बेवारस मृतदेह आढळला होता. या मृतदेहाच्या हातावर फक्त लुचना इतकंच गोंदलेलं होतं.
कल्याण : अवघ्या चार हजार रुपयांसाठी मित्राचा खून करणाऱ्या मित्राला कल्याण क्राईम ब्रँचने अटक केली आहे. बेवारस मृतदेहाचा माग काढत अवघ्या चार दिवसात क्राईम ब्रँचने ही कारवाई केली.
लोकसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी, 26 एप्रिल रोजी पोलिसांना दिवा पनवेल रेल्वेमार्गावर एक बेवारस मृतदेह आढळला होता. या मृतदेहाच्या हातावर फक्त लुचना इतकंच गोंदलेलं होतं. त्यानुसार क्राईम ब्रँचने तपासाची चक्र फिरवत चारच दिवसात कोपर भागातून सौदागर तांडी याला ताब्यात घेतलं.
सौदागरच्या चौकशीत मृताचं नाव लुचना सुना असं असून तो सौदागर याचा मित्र असल्याचं समोर आलं. लुचना याने सौदागरकडून चार हजार रुपये उसने घेतले होते.
मात्र लुचना हे पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असल्यानं आपण झोपेत त्याची गळा चिरुन हत्या केली आणि मृतदेह रेल्वे रुळावर टाकला, अशी कबूली सौदागरने दिली. याप्रकरणी सौदागरला अटक करण्यात आली असून मानपाडा पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला आहे.