एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकरचा फ्लॅट असलेल्या ‘ला मेर’ इमारतीला आग
आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग लागली. आग बहुदा शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईच्या वांद्रेतल्या ‘ला मेर’ इमारतीला लागलेल्या आगीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं घर भक्ष्यस्थानी पडल्याची शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग लागली. आग बहुदा शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन ही आग आटोक्यात आणल्याने फार नुकसान झाले नाही. याच इमारतीत नवव्या आणि दहाव्या मजल्यावर सचिनचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये सध्या सचिनचे सासू आणि सासरे राहत होते. पण वेळीच आग आटोक्यात आल्याने कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान, याच इमारतीतील अकरावा आणि बारावा मजला अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या मालकीचा होता. सध्या तिची आई तिथे राहते. यासोबत याच इमारतीमध्ये अनेक सेलिब्रिटींचीही घरे आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























