एक्स्प्लोर
भिवंडीत मतदानादरम्यान शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
भिवंडीत पंचायत समितीसाठी काल (बुधवार) झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत तुफान राडा झाला.
भिवंडी : भिवंडीत पंचायत समितीसाठी काल (बुधवार) झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत तुफान राडा झाला. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादामुळे इथं तुंबळ हाणामारी झाली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.
काल्हेर भागात शिवसेनेतर्फे दीपक म्हात्रे हे निवडणूक लढवत होते. मतदानाच्या दिवशी भाजप उमेदवाराच्या बाजूने माजी आमदार योगेश पाटील निवडणूक केंद्राबाहेर थांबले होते. यावेळी केंद्राबाहेर थांबण्यावरुन दोघांच्याही समर्थकांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचेच पर्यवसान हाणामारीत झालं.
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीमारही केला आणि दोन्ही गटांना पांगवण्यात आलं. काल्हेर ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच हा प्रकार घडला. या प्रकारामुळे दिवसभर इथलं वातावरण तणावपूर्ण होतं. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement