एक्स्प्लोर
मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात दोन गँगस्टरमध्ये हाणामारी
अनिल पाटीलने या घटनेनंतर कुलाबा पोलीस स्थानकात जाऊन याची तक्रार नोंदवली आहे. या घटनेत सहभागी व्यक्ती आणि एकदंरीत परिस्थिती पाहता पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत 'एनसी' दाखल करुन घेतली आहे. डी. के. राव याच्यावर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशाप्रकारचे 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातच बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी कुख्यात गुंड दिलीप बोरा उर्फ डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांना खंडणीच्या एका प्रकरणात कोर्टापुढे हजर करण्यात आलं होत. यावेळी काही कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं.
अनिल पाटीलने या घटनेनंतर कुलाबा पोलीस स्थानकात जाऊन याची तक्रार नोंदवली आहे. या घटनेत सहभागी व्यक्ती आणि एकदंरीत परिस्थिती पाहता पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत 'एनसी' दाखल करुन घेतली आहे. डी. के. राव याच्यावर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशाप्रकारचे 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राव आणि पाटील यांना आर्थर रोड जेलमधून पोलीस बंदोबस्तात कोर्टात सुनावणीसाठी हजर केलं होतं. सुनावणीला थोडा अवकाश असल्याने हे दोघे कोर्टाबाहेर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायऱ्यांजवळ थांबले होते. त्याचवेळी रावने पाटीलला, "त्या बिल्डरला मेसेज कर, आणि पैशांचं माझ्याशी बोलायला सांग," असं सांगितलं. यावर पाटीलने, "होय" म्हणून उत्तर दिलं. मात्र हे उत्तर उर्मटपणे दिल्याचं वाटल्याने रावने पाटीलला त्याचा जाब विचारला. "जरा कमी आवाजात बोल" असं दरडावत त्याच्या डोक्यावर एक टपली मारली.
याचा राग आल्याने पाटीलने थेट रावच्या अंगावर धाऊन जात धक्काबुक्की सुरु केली. यावेळी पाटीलचे काही साथीदार जे आसपासच उपस्थित होते, तेदेखील पाटीलच्या मदतीला धावून आले. त्यामुळे घाबरुन रावने तिथून पळ काढत थेट मकोका कोर्ट गाठलं. तिथे त्याने न्यायधीशांकडे याची तक्रार केली. यावर कोर्टाने पोलिसांना यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement