एक्स्प्लोर

Anil Parab : सकाळीच अनिल परबांच्या घरावर ईडीची टक...टक; 'या' ठिकाणी छापासत्र सुरू

ED Raids Anil Parab : आज सकाळीच ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानी छापा मारला. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे.

Anil Parab:  शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर व्यक्तींवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीने आतापर्यंत सात ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. 

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या  कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे  सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत. 

>> ईडीकडून या ठिकाणी छापा

1. अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ

2. मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व

3.  अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.

4. दापोलीतील साई रिसॉर्ट

5. दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी

6. दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय

ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन?

पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला. दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने सीबीआय विशेष कोर्टाकडे माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.  

अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
Sanjay Raut : पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vijay Karanjkar : ठाकरे गटाच्या विजय करंजकरांकडून बंडखोरीचा इशाराSupriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP MajhaRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी कुटुंबीयांभोवती एसीबी कारवाईचा फास : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 PM :  28 March 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
Sanjay Raut : पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार
मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार
IPL 2024: पहिल्याच मॅचमध्ये 66 धावा दिल्या, मुंबईचा बॉलर ट्रोल, बॅटिंग कोचकडून पाठराखण, म्हणाले...
युवा बॉलरला पहिल्याच मॅचमध्ये हैदराबादनं धुतलं, क्वेना मफाकाच्या समर्थनार्थ कोण मैदानात उतरलं?
MDMK leader A Ganeshamurthi Died : लोकसभेला उमेदवारी न मिळाल्याने विष प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ
लोकसभेला उमेदवारी न मिळाल्याने विष प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार?इच्छुक असलेल्या प्रवीण परदेशींना घड्याळ चिन्हावर लढण्याची अट, सुत्रांची माहिती
धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार? इच्छुक असलेल्या प्रवीण परदेशींना घड्याळ चिन्हावर लढण्याची अट
Embed widget