एक्स्प्लोर

सरनाईक, राऊत अन् परब...; आतापर्यंत शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर?

Maharashtra And ED Conection : अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीची धाड. आतापर्यंत कोणकोणत्या शिवसेना नेत्यांवर करण्यात आली ईडीकडून कारवाई, जाणून घ्या.

Maharashtra And ED Conection : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून राज्य सरकारमधील आणि प्रामुख्यानं शिवसेनेमधील अनेकांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य केलं जात आहे. अशातच आज शिवसेना (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून (ED) कारवाई करण्यात आली. अनिल परब यांच्या शासकीय निवास्थानावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली असून त्यांच्या वांद्र्यातील निवास्थानीही धाड टाकण्यात आली. तसेच, अनेक निकटवर्तीयांच्या घरीही ईडीनं धाडी टाकल्याचं समोर आलं आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह (CM Uddhav Thackeray) शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांवर सातत्यानं घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. काही दिवसांपासून राऊत विरुद्ध सोमय्या हा थेट सामना रंगल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. किरीट सोमय्यांकडून सातत्यानं संजय राऊतांनंतर अनिल परबांना लक्ष्य केलं जात होतं. तसेच, अनिल परबांनी केलेल्या घोटाळ्याचे सर्व पुरावे असल्याचा दावाही सोमय्यांनी वारंवार केला होता. अखेर आज ईडीकडून परबांशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुद्दाम सरकारमधील मंत्र्यांना आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. 

आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर काहींच्या संपत्तीवरही ईडीकडून टाच आणण्यात आली आहे. जाणून घेऊया आतापर्यंत ईडीच्या रडावर असलेले शिवसेने नेते कोण? 

अनिल परब 

अनिल देशमुख चौकशी प्रकरणी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहीलेल्या पत्रात अनिल परबांवर खंडणी वसूल करण्याचे आरोप लावले आहेत. 

संजय राऊत 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काही दिवसांपूर्वी ईडीनं चौकशी केली होती. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. याच प्रकरणी संजय राऊतांच्या संपत्तीही ईडीकडून अटॅच करण्यात आली होती. 

प्रताप सरनाईक 

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

भावना गवळी 

भावना गवळी यांच्या वडिलांचे सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरलं होतं. एवढंच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती. भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. 

अर्जुन खोतकर 

अर्जुन खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ED कडून तपासणी करण्यात आली होती. 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. 

आनंदराव अडसुळ 

सिटी बॅंकेच्या माध्यमातून मराठी माणसांची फसवणूक केल्याचा आरोप आनंदराव अडसुळांवर लावण्यात आला आहे. सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यासाठी अडसूळांनी कमिशन घेतल्याचा आरोप आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.