एक्स्प्लोर

ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

ED Raids On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने आज सकाळी छापा मारला.

ED Raids On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय, ईडीने अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला.  

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. 

ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन?

पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला. 

अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. 

अनिल परबांनी बॅग भरावी: किरीट सोमय्या

अनिल परब यांनी आता आपली बॅग भरावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. अनिल परब यांच्यावर आता ईडीकडून अटकेची कारवाई होण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले.

 

महत्त्वाच्या बातम्या

ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget