एक्स्प्लोर

नकली IPS अधिकाऱ्याला फिल्मी स्टाईल पाठलाग करत मुंबई पोलिसांकडून अटक, व्यावसायिकाकडून उकळले लाखो रुपये

मुंबई पोलिसांच्या पुणे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एका 38 वर्षीय राजस्थानमधील इसमाला अटक केली आहे. जो स्वतःला आयपीएस अधिकारी भासवून लोकांची फसवणूक करत होता

मुंबई : मुंबई पोलिसांच्या पुणे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एका 38 वर्षीय राजस्थानमधील इसमाला अटक केली आहे. जो स्वतःला आयपीएस अधिकारी भासवून लोकांची फसवणूक करत होता, हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने गुजरातमधील एका व्यावसायिकाकडून 16 लाख रुपये खंडणी घेतली. याला पकडण्यासाठी पोलिसांनी याचा 1200 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी गाडीने गुजरात ते बंगळुरु प्रवास 24 तासात केला आणि त्याचा पाठलाग करत मुंबई पोलिसांनी शेवटी त्याला अटक केली. आपलं उच्चभ्रूसारखं राहणीमान आणि फसवी वृत्ती यामुळे हा बड्या व्यवसायिकांची फसवणूक करायचा. अटक केलेल्या आरोपीचं नाव शिवशंकर शर्मा असून तो राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील ब्यावरचा राहणार आहे. सुरतचे राहणारे कपड्याचे व्यवसायिक मोहम्मद एहतेशाम असलम नावीवाला यांच्या तक्रारीनंतर शिवशंकर शर्माला अटक करण्यात आली. काही आठवड्यांपूर्वी शिवशंकर शर्मा कडून नाविवाला यांना फोन आला होता.  त्याने स्वतःला आयपीएस अधिकारी म्हणत नावीवाला यांच्या संदर्भात डीआरआय आयात आणि निर्यात करण्यासाठी असलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी  तक्रार करण्यात आली आहे. जी सेटल करण्यासाठी आरोपी शर्मा यानं मध्यस्थी करण्याचं सांगून नावीवालाकडून त्या मोबदल्यात कमिशनची मागणी केली. आणि त्यासाठी शर्मा यानी नावीवाला यांना मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलणी करण्यासाठी बोलावले. हॉटेलच्या रूममध्ये नावीवाला आणि शर्माची बोलणी फिस्कटली आणि वाद सुरू झाला त्याच्या नंतर शर्माने नावीवाला यांना मारहाण केली. 2 दिवस हॉटेलच्या रूममध्ये बंद करून ठेवले आणि नंतर त्यांना खंडणी वसूल करण्यासाठी गन पॉईंटवर आपल्या गाडीने गुजरातमध्ये गेले. 16 लाख रुपयांची खंडणी मिळाल्यानंतरच शिवशंकर शर्माने नावीवाला यांना सोडलं.  यानंतर नावीवाला यांनी गुजरात पोलिसांकडे धाव घेतली, मात्र त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्याच्यानंतर नावीवाला हे मुंबई आले आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आणि हे जाळ इतर राज्यात पसरल असल्याचे लक्षात येता गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. खंडणीविरोधी पथकाने एक स्वतंत्र पथक तयार केलं आणि शिवशंकर शर्माच्या शोधात लागले. तांत्रिक बाबींचा आढावा घेत आपल्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शर्मा गुजरातमध्ये आला असल्याचं त्यांना त्यांना कळलं. खंडणीविरोधी पथक गुजरातला रवाना झालं, मात्र शर्माला सुगावा लागला की पोलीस त्याच्या पाठीशी आहेत आणि तो वारंवार स्थलांतरित होत राहिला. सलग 24 तास पाठलाग करत गुजरातमधून बंगळुरुला जाऊन मुंबई पोलिसांनी शिवशंकर शर्माला शेवटी अटक केलं आणि मुंबईला घेऊन आले. तपासामध्ये कळलं की नावीवाला यांच्या विरोधात डीआरआय मध्ये तक्रार दाखल आहे आणि याची माहिती शिवशंकर शर्माला मिळाली त्याचा फायदा घेण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली. शिव शंकर शर्मा हा सराईत गुन्हेगार असून गेल्या वर्षी सुद्धा एका धाबा चालकाला खंडणीसाठी धमकावल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. तर गुजरातमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून सुद्धा लाखो रुपये उकळले असल्याचं स्पष्ट झालं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
Embed widget