एक्स्प्लोर

मुंबईत डॉ. होमी भाभा विद्यापीठ स्थापनेला मान्यता

मुंबईतील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) या मुख्य विद्यालयासह सिडनहॅम कॉलेज, एलफिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय (बीएड कॉलेज) यांचा समावेश असलेली डॉ. होमी भाभा विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबई : उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच मुंबई विद्यापीठावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील चार महाविद्यालयांना एकत्रित करून डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीभिमुख अभ्यासक्रम राबविणे आता अधिक सुलभ होणार आहे. सध्या मोठ्या संख्येने संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमुळे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासह आवश्यक त्या भौतिक सुविधांची तपासणी करणे विद्यापीठांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील 3 ते 5 महाविद्यालये एकत्र केल्याने विविध विद्याशाखांचा संगम होऊन समूह विद्यापीठाची स्थापना केल्यास उपलब्ध मानव संसाधन व अन्य साधन सुविधांचा अधिकाधिक वापर होऊ शकणार आहे. तसेच वेगाने बदलत जाणाऱ्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात रोजगार निर्मितीभिमुख अभ्यासक्रम राबविणे समूह विद्यापीठांना शक्य होणार आहे. मुंबईत असे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रूसा 2.0 अंतर्गत शासनाच्या या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यानुसार मुंबईतील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) या मुख्य विद्यालयासह सिडनहॅम कॉलेज, एलफिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय (बीएड कॉलेज) यांचा समावेश असलेली डॉ. होमी भाभा विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या युनिव्हर्सिटीसाठी आवश्यक पदनिर्मितीसह आवर्ती व अनावर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Maharashtra Auto Rickshaw Strike: मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही? रिक्षा संघटनांची राज्यव्यापी बंदची हाक, नेमकं कारण काय?
मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही? रिक्षा संघटनांची राज्यव्यापी बंदची हाक, नेमकं कारण काय?
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी

Embed widget