Mumbai Ganeshotsav: जुन्या ब्रिजचा वापर करताना नाचत जाऊ नका, ते धोकादायक आहेत; मुंबई पोलिसांचं गणेशभक्तांना आवाहन
Mumbai Lalbaug Visarjan : मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसार, हे पूल घाटकोपर, करी रोड, आर्थर रोड किंवा चिंचोपोकळी, भायखळा, मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड, फ्रेंच आरओबी ( रेल ओवर ब्रिज), केनेडी आरओबी, फॉकलँड आरओबी (ग्रॅट रोड आणि चर्नी रोड दरम्यान), मुंबई सेंट्रल येथील बेलासिसच्या, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि दादर टिळक पूल वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Mumbai Ganeshotsav: मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) विसर्जनाच्या (Mumbai Visarjan) दिवशी जुन्या आणि धोकादायक पुलांचा वापर करताना भाविकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ट्रॅफिक पोलिसांनी (Trafic Police) सांगितलं की, 13 जुन्या आणि धोकादायक रेल्वे पुलांवर नाचू नका आणि गाणी अजिबात वाजवू नका, कारण ते पूल धोकादायक आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसार, हे पूल घाटकोपर, करी रोड, आर्थर रोड किंवा चिंचोपोकळी, भायखळा, मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड, फ्रेंच आरओबी ( रेल ओवर ब्रिज), केनेडी आरओबी, फॉकलँड आरओबी (ग्रॅट रोड आणि चर्नी रोड दरम्यान), मुंबई सेंट्रल येथील बेलासिसच्या, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि दादर टिळक पूल वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आज अनंत चतुर्दशी असल्यानं मोठ्या संख्येनं लोक मिरवणुकीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार 100 पेक्षा जास्त लोक कोणत्याही वेळी पूल ओलांडू शकत नाहीत, मिरवणूक तिथे थांबू शकते आणि त्यावर गाणी वाजवून नाचू आणि नृत्य करू नये.
दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आज शहरातील सुमारे 93 रस्ते विसर्जनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईत 24, मध्य उपनगरात 32 आणि पूर्व उपनगरात 27 आणि पश्चिम उपनगरात 10 च्या आसपास आहेत. गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार?
नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शनते मेट्रो जंक्शन, जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलान आझाद रोड, बेलासिस रोड,मौलाना शौकत अली रोड, डॉ. बी. ए. रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल, 60 फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिय मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग
महत्त्वाच्या इतर बातम्या :