एक्स्प्लोर
Advertisement
दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण झाली. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सचिन अंधुरेच्या नातेवाईक आणि मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सचिन अंधुरेच्या माहितीनंतर सीबीआय आणि महाराष्ट्र एटीएसने ही संयुक्त कारवाई केली.
सचिन अंधुरेच्या नातेवाईक आणि मित्राच्या घरातून एक 7.65 bore पिस्तूल, तीन जिवंड काडतुसं, एक तलवार आणि एक कट्यार जप्त करण्यात आली आहे. दाभोलकरांची हत्या करण्यासाठी या पिस्तूलचा वापर केल्याचा संशय सीबीआयला आहे. सीबीआय ही शस्त्र फॉरेन्सिक तपासणीसाठी एफएसएलमध्ये पाठवणार आहे.
तसंच याच पिस्तूलचा वापर कॉम्रेड गोविंद पानसरे, विचारवंत आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमध्येही वापर झाला असावा, असा अंदाज तपास यंत्रणांना आहे. त्याचाही तपास सुरु आहे.
सचिन अंदुरे सीबीआय कोठडीत
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपी सचिन अंदुरेला सीबीआयने 19 ऑगस्टला अटक केली. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला अटक करण्यात आली. कोर्टाने अंदुरेला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून 26 ऑगस्टपर्यंत तो सीबीआय कोठडीत असेल.
सचिन अंदुरे कोण आहे?
सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण
20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण झाली. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement