एक्स्प्लोर
ठाण्यात सिलेंडरचा स्फोट, चौघं गंभीर जखमी
ठाण्यात आज (बुधवार) सकाळच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एकाच कुटुंबातील चौघं जण गंभीर जखमी झाले.

ठाणे : ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात राधाबाई चाळ येथे आज (बुधवार) सकाळच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं जाधव कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सिलेंडर स्फोटात जाधव यांच्या घराची भिंत देखील कोसळली आहे. स्फोटात 60 वर्षीय दगडू जाधव, पत्नी दर्शना जाधव, प्रीती आणि तृप्ती जाधव हे गंभीर झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत स्फोट झालेला सिलेंडर ताब्यात घेतला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























