(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus In Mumbai: मुंबईत रुग्णसंख्या वाढतीच, रविवारच्या तुलनेत आज कमी रुग्णांची नोंद
Mumbai Corona Updates: मुंबईत आज आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai Coronavirus Updates: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत आज 8 हजार 82 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दोन मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 622 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 51 हजार 358 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 138 दिवसांवर पोहचलाय. मुबंईत सध्या 37 हजार 274 रुग्ण सक्रीय आहेत.
सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी एका विशेष मुलाखातीत दिलीय. तसेच ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन आणि होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
मुंबईतील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-