Mumbai Omicron cases: मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती
मुंबईत (Mumbai ) कोरोना (Corona) रूग्ण वाढत आहेत. सध्या मुंबईतील कोरोना रूग्णांपैकी 80 रूग्ण ओमायक्रॉनबाधित (Omicron) असल्याचे BMC चे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी सांगितले
मुंबई : मुंबईमधील (Mumbai ) कोरोनाबाधितांच्या (Corona) स्पाईकमध्ये ओमायक्रॉनचाच (Omicron) हात असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत असताना डॉ. चहल यांनी याबात माहिती दिली आहे.
सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी या विशेष मुलाखतीत दिली आहे. असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी यावेळी दिली.
मुंबईच्या कोविड पॉजिटिव्हिटी रेटमध्ये 21 डिसेंबरपासून वाढ होत आहे. त्याला आज 14 दिवस झाले आहेत. 21 डिसेंबरपूर्वी मुंबईचा पॉजिटिव्हिटी दर एक टक्क्यांपेक्षा कमी होता. त्यानंतर आज चौदाव्या दिवशी मुंबईचा कोरोना वृद्धी दर हा 17 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 7 डिसेंबर रोजी सापडला होता. त्यापूर्वीच केंद्राच्या ओमायक्रॉन बाबत गाईडलाईन्स मिळाल्याने मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत खास होम क्वारंटाईन प्रणाली सुरु केली. 3 डिसेंबर म्हणजे आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वीच मुंबई महापालिकेने ओमायक्रॉनबाबत ही क्वारंटाईन प्रणाली राबवायला सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 11 हजार 877 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी आढळलेल्या रूग्णांमधील 7 हजार 792 रूग्ण फक्त मुंबईतील आहेत. आजही मुंबईत एवढेच रूग्ण आढळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा रूग्ण आढळल्यानंतर जगभरातील देशांनी सतर्कता बाळगली. परंतु, जवळपास शंभर पेक्षा जास्त देशात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतातही आपर्यंत 1700 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकेडवारीनुसार, राज्यात काल 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या आता 510 वर पोहोचली आहे. त्यातच आता मुंबईत आढळणाऱ्या कोरोना रूग्णांमधील 80 टक्के रूग्ण हे ओमयक्रॉनचे असल्याची माहिती डॉ. चहल यांनी दिली आहे.
दिल्लीतही ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ
मुंबईप्रमाणेच राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30-31 डिसेंबर दरम्यान सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या जिनोम सिक्वेन्स अहवालानुसार, 84 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉनचे असल्याचा दावा जैन यांनी केलाय.
As per genome sequencing reports of Dec 30-31, Omicron found in 84 per cent of Covid samples tested: Delhi Health Minister Satyendar Jain
— Press Trust of India (@PTI_News) January 3, 2022
महत्वाच्या बातम्या
- Exclusive : कोरोनाची तिसरी लाट येणार नाही कारण... पाहा काय म्हणतायेत डॉ. रवी गोडसे
- corona Cases In india : देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद, ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही वाढ
- Kolhapur : 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात,कोल्हापुरात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद