Coronavirus | क्वॉरन्टाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी 'मुंबई आयआयटी'कडून क्वॉरन्टाईन अॅपची निर्मिती
क्वॉरन्टाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे, असे आवाहन सरकारडून केले जात आहे. तरिदेखील अनेक क्वारंटाईन केलेले अनेक नागरिक बिनदिक्कतपणे बाहेर फिरताना दिसतात.
मुंबई : एकीकडे देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या पार्श्वभूमीवर क्वॉरन्टाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे, असे आवाहन सरकारडून केले जात असताना सुद्धा काही क्वॉरन्टाईन केलेले नागरिक समाजात फिरत असल्याचं मागील काही दिवसात लक्षात आलं. त्यामुळे आता या क्वॉरन्टाईन केलेल्या व्यक्तींचा त्यासोबतच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर नजर ठेवणं गरजेचे आहे, नाहीतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे यावर उपाय काढण्यासाठी आयआयटी बॉम्बे पुढे सरसावली आहे. आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांच्या टीमने 'क्वॉरन्टाईन' नावाच्या अॅपची निर्मिती केली असून या साहाय्याने संबंधित अधीकृत यंत्रणेला क्वॉरन्टाईन केलेली व्यक्ती नेमकी कोणत्या परिसरात आहे? ती व्यक्ती त्याला नेमून दिलेल्या परिसरातच आहे की इतरत्र कुठे? याची माहिती मिळू शकणार आहे.
ज्या व्यक्ती कोरोनाने बाधित नाहीत त्यांना अलर्ट देण्यासाठी हे अॅप जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यांना आपण क्वॉरन्टाईन लोकांच्या संपर्कात आलो याची माहिती मिळणार असल्याने ते जास्त सतर्क राहू शकतील, अशी माहिती टीमचे प्रमुख मंजेश हनवल यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक बाधित रुग्ण त्यांना क्वॉरन्टाईन केलेले असतानाही नियमांचा भंग करून इतरांचे आरोग्य धोक्यात घालतानाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या जीवाला यामुळे धोका आहेच मात्र यामुळे इतरांना संसर्ग होऊन हा आजार पसरण्याची शक्यता टाळता येईल. संबंधित रुग्णाच्या हालचाली लक्षात घेऊन यंत्रणेला मुनष्यबळाचा वापर करून संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे अॅप उपयुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाहा व्हिडीओ : संचारबंदीच्या काळातही मुंबईतील डोंगरी भागात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
आयआयटी बॉम्बेचे मंजेश हनवल, गणेश रामकृष्णन, यांनी या ऍपची निर्मिती केली असून यासाठी त्याना आयआयटीचे माजी विद्यार्थी अस्विन गमी आणि पीएचडी स्कॉलर आयुष्य महेश्वरी, अधिकारी अर्जुन साबळे यांचीही मदत मिळाली आहे.
हे अॅप कसे वापरले जाणार? हे अॅप क्वॉरन्टाईन व्यक्तीच्या किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मोबाईल फोनवर अधिकृत यंत्रणेद्वारे इनस्टॉल करून घेता येणार आहे. हे अॅप इनस्टॉल केल्यानंतर यामध्ये वेळोवेळी जीपीएस सूचना येत राहणार आहेत. संबंधित क्वॉरन्टाईन व्यक्तीने त्याला नियोजित परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास याचा अलर्ट तात्काळ प्रशासनाला मिळणार असून त्याला बाहेर समाजात जाण्यापासून वेळीच रोखता येऊ शकणार आहे. प्रशासनाला यामुळे क्वारंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा उपयोगाची ठरणार आहे. शिवाय, प्रशासनाकडून हे ऑपरेट केले जाणार असून त्याचा लॉग इन आयडी, पासवर्ड प्रशासनांकडे असणार आहे.
क्वॉरन्टाईन सेफ आयआयटी बॉम्बेच्या प्राचार्य भास्करन रमण आणि कामेश्वरी छेब्रॉलू यांनी मिळून आणखी एक सेफ नावाचे अॅप्लिकेशन तयार केले आहे, जे क्वारंटाईन व्यक्ती त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन किंवा मर्यादा पाळतात की नाही यावर लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे.
आयआयटी बॉम्बेच्या या दोन्ही अॅप्लिकेशन्सची माहिती या संस्थेकडून आणि संबंधित डिपार्टमेंटकडून महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आयआयटी बॉम्बेकडून देण्यात आली आहे. ती मिळाल्यानंतर याचा वापर सुरु करण्यात येऊन लोकांच्या उपयोगात आणता येईल असे सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईतील सैफी रुग्णालयातील कोरोनाबाधित सर्जनचे रुग्णांवर उपचार; पालिकेकडून हॉस्पिटल सील
Coronavirus | कोरोना संकट | राज्यभरात 22,118 खोल्यांमध्ये 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण