Coronavirus | ठाण्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 21 वर
भारतातील सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. अशातच ठाण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 वर जाऊन पोहोचला आहे.
ठाणे : ठाणेकरांनी आता आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण ठाण्यात एकाच दिवशी 5 कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. यातील एकाचा काल मुंबईच्या केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील covid-19 बाधित रुग्णांची संख्या आता 21 वर पोचली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आधी 3 रुग्ण covid-19 बाधित असल्याचे समोर आले होते. तर संध्याकाळी उशिरा आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यातील एक रुग्ण हा मुंब्रा येथे राहणारा होता. त्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल त्याचा मृत्यू झाला. मुंब्रा येथील पहिल्या covid-19 पॉझिटिव्ह रुग्णाचा हा नातेवाईक असल्याचे समजत आहे. तसेच हे दोघे शेजारी-शेजारी असलेल्या बिल्डिंगमध्ये राहत असल्याने ही बिल्डिंग आणि आसपासचा परिसर पोलिसांनी सील केला आहे.
पाहा व्हिडीओ : पाच मिनिटात रिझल्ट देणारं रॅपिड किट नेमकं कसं काम करतं? स्पेशल रिपोर्ट
कळव्यात रविवारी आणखी एक covid-19 रुग्ण आढळून आला. हा रुग्ण राहत असलेली संपूर्ण चाळ पालिकेने आता सील केली आहे. चाळीस वर्षांचा हा रुग्ण ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहे. तर दुसरा रुग्ण काजू वाडी परिसरात आढळून आला. तो मुंबईतील एका बड्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन विभागात काम करणारा कर्मचारी आहे. 28 वर्षांचा हा तरूण आता मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतो आहे.
तर संध्याकाळी उशीरा आणखी दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील एक रुग्ण एका बड्या आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये आढळून आला आहे. तर दुसरा रुग्ण हा एक डॉक्टर असून, कळव्यातील एका रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे याला covid-19 ची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पालिकेतर्फे या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील नागरिक शोधण्याचे आणि तो परिसर सील करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | राज्यात कालपासून 113 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 748 वर
देश दिव्यांनी उजळला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईतील अनेक परिसर कंटेनमेंट झोन, या झोनमध्ये कसं चालणार काम?
Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?