देश दिव्यांनी उजळला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभर लोकांनी दिवे लावू, मेणबत्ती लावून, टॉर्च लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनला प्रतिसाद दिला. नेते मंडळी, सेलिब्रिटींपासून ते सर्व सामान्य नागरिक मोठ्या उत्साहात, हिमतीने कोरोना विरुद्धच्या लढाईत एकजुटीने समोर आले आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला घरातील लाईट बंद करून घरात, अंगणात, गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशातील नागरिकांनी पाठिंबा देत रात्री 9 वाजता घरातील लाईट घालवून दिवे लावले आणि कोरोना विरोधातील आपली एकी दाखवून दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या कुटुंबियांसोबत राष्ट्रपती भवनाबाहेर मेणबत्ती पेटवून उभे राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिवे पेटवले. ट्विटरवर त्यांनी काही फोटो शेअर केले. या ट्वीटमध्ये मोदींनी लिहिलं की, "शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते"
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ pic.twitter.com/4DeiMsCN11
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2020
केंद्रीय गृहमंत्री यांनीही आपल्या दिल्लीतील निवासस्थानाच्या लाईट्स बंद करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला. अमित शाह यांनी लिहिलं की, "आशा आणि विश्वासाची एक किरण अंधकार दूर करु शकते."
आशा और विश्वास की एक किरण बड़े से बड़े अंधकार को दूर कर सकती है।
प्रधानमंत्री @narendramodi जी के आवाहन पर आज रात 9 बजे, नई दिल्ली के अपने आवास की लाइट बंद कर दीये जलाये। COVID-19 के विरुद्ध इस लड़ाई में पूरा देश @narendramodi जी के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ा है। #9pm9minute pic.twitter.com/QUlknqZtQy — Amit Shah (@AmitShah) April 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही राजभवन येथे लाईट बंद करून दीप प्रज्वलित करून कोरोनाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यास देश एकत्र आहे हा संदेश दिला.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सहकुटुंब दीप प्रज्वलित करुन नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला पाठिंबा दिला.
संबधित बातम्या