एक्स्प्लोर

Coronavirus | होम कॉरंटाईनच्या सूचना देऊनही स्थलांतर कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाई होणार

महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून आज सांगण्यात आले.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलिस यंत्रणेला आज दिले.  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत अशांना होम क्वारंटाईनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईनचे आदेश आहेत त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून आज सांगण्यात आले. कोरोना व्हायरसचा विळखा आता वेगाने वाढताना दिसत आहे. हे संकट दूर ठेवण्यासाठी सरकार, प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यासाठी शासनस्तरावरुन मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, लोक अजूनही गंभीर नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरुन समोर येत आहे. परदेशातून आलेले किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांना होम कॉरंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच अशा लोकांनी माहिती लववून न ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलंय. मात्र, लोक या नियमांचे उल्लघन करत असल्याच्या काही घटना समोर आल्यात. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश जास्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. होम कॉरंटाईन असा शिक्का मारलेले लोक खुशाल सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असल्याचे समोर आल्याने आपण सुधारणार कधी अशा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पिंपरी चिंचवडमधील आठ डॉक्टरांनी देखील होम कॉरंटाईनचे उल्लंघन केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली. रशियामधील कॉन्फरन्स पार पाडून 13 ते 14 मार्च दरम्यान आले. पण या आठ ही डॉक्टरांनी ही बाब दोन दिवस प्रशासनाला सांगितली नव्हती. मात्र, नंतर म्हणजे 16 ते 17 मार्च पासून स्वतःहूनच त्यांनी होम कॉरंटाईन सुरू केलं. ज्यांच्यावर रुग्णाची जबाबदारी असते असे डॉक्टरच याचं उल्लंघन करू लागल्याने, सर्वांनाच धक्का बसला. Coronavirus | मुंबई-पुण्यावरुन गावाकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची रेल्वे, बस स्थानकावरच तपासणी तरुणाकडून होम कॉरंटाईनचे उल्लंघन; कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाकडून होम कॉरंटाईनचा भंग झाल्याचं समोर आलंय. वारंवार घराबाहेर फिरणाऱ्या या तरुणाला शनिवारी पालिका प्रशासन आणि पोलिसांनी थेट रुग्णालयातच दाखल केले. नॉर्वे वरून आलेला या तरुणाला तीन दिवसांपूर्वी 14 दिवस होम कॉरंटाईनच्या सूचना होत्या. मात्र, तो नेहमी घरातून बाहेर पडायचा, पाहुण्यांचीही ये जा सुरू होती, एसीमध्ये न बसण्याचा सल्ला दिला असताना ही त्याने एसी ऑपरेटरला घरात बोलावलं, अशा तक्रारी येत होत्या. म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याला समज ही दिली होती. मात्र, तरीही नियम न पाळल्याने त्याला रुग्णालयातच दाखल करण्यात आलं. Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार मुंबईत रेल्वे स्थानकावर कॉरंटाईन स्टॅम्प असलेले 16 जणांना थांबवलं ज्यांना घरी कॉरंटाईन राहण्यासाठी सांगितले आहे, अशांच्या हाता कॉरंटाईन स्टॅम्प लावला जात आहे. असे संशयित आता सार्वजनिव वाहतूक व्यवस्था वापरताना दिसत आहेत. नाशिकमध्ये आज एकजण एसटी बसने प्रवास करताना आढळला. तर, रेल्वे मंत्रालयानेही कॉरंटाईन स्टॅम्प असलेल्या आठ जणांनी रेल्वेने प्रवास केल्याची माहिती ट्विट केली आहे. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कॉरंटाईन स्टॅम्प असलेले 16 जण आढळले. रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना थांबवण्यात आले. त्यांना वरळीला कॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलय. Coronavirus | गोव्यात पर्यटकांना बंदी, कोरोनाच्या सावटामुळे 144 कलम लागू, सरकारने घेतले अनेक महत्वाचे निर्णय होम कॉरंटाईनची सूचना असतानाही उद्यान एक्सप्रेसने प्रवास होम कॉरंटाईनची सूचना असतानाही मुंबईवरून गुलबर्गाकडे उद्यान एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाला दौंड रेल्वे स्थानकवर उतरविण्यात आले आहे. पूर्वसूचना देऊनही आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने सदर प्रवासी पावणे दोन तास स्ट्रेचरवर होता. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि प्रादुर्भाव वाढू नये याकरीता कतार येथून मुंबई विमानतळावर आलेल्या या प्रवाशाच्या हातावर मुंबई येथे होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. दरम्यान विमानतळावरून आलेला हा 28 वर्षीय तरूण आज (ता. 21) साध्या तिकिटावर मुंबई-बेंगळूरू उद्यान एक्सप्रेसच्या आरक्षित डब्ब्यातून प्रवास करीत होता. हातावर शिक्का असतानाही प्रवास करीत असल्याने उद्यान एक्सप्रेस मधील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे चौकशी करून नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने त्या प्रवाशाला दौंड येथे उतरविण्याचे आदेश दिले. Coronavirus | कनिका कपूरमुळे कोरोना थेट राष्ट्रपती भवनात? राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार कोरोना तपासणी गायिका कनिका कपूरकडूनही उल्लंघन बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती. या अगोदरही असे बऱ्याच घटना उघड झाल्या आहेत. सरकार, प्रशासन इतक्या पोटतिडकीने सांगूनही आपण सुधारणार कधी? आपण आपल्यासोबत कुटुंब आणि समाजाचाही जीव धोक्यात घालतोय हे कधी कळणार? असे प्रश्न आता जागृत समाजमनातून उपस्थित होत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Embed widget