एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | मुंबईतली कॉरंटाईन क्षमता संपली, आता विमानतळावरुनच प्रवाशांची मुंबईबाहेर रवानगी
मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये परदेशातून येणाऱ्या आणि संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. मात्र, त्यावरचा ताण वाढत असल्यामुळे खासगी हॉटेलांना देखील पालिकेकडून आणि सरकारकडून क्वॉरंटाईन सुविधा पुरवण्यासाठी हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन करण्यात येत होतं.
मुंबई : मुंबईतली क्वॉरंटाईन क्षमता संपली असल्याची माहिती आहे. आता विमानतळावरून प्रवाशांची थेट होणार मुंबईबाहेर रवानगी होणार असल्याची माहिती आहे. परदेशातून मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांना थेट त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी क्वॉरंटाईनसाठी पाठवण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यासाठी मुंबईत जागा अपुरी पडत असल्यामुळे आता विमानतळावरून या प्रवाशांना थेट त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा घरी पाठवलं जाणार आहे. यासंदर्भात महानगर पालिकेने राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली असून त्यासंदर्भातलं परिपत्रकच मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी काढलं आहे.
Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये होम कॉरंटाईनचे उल्लंघन; तरुणाचा कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क
त्यामुळे आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रवानगी थेट मुंबईबाहेर होणार आहे. मुंबईत क्वॉरंटाईन करण्यासाठीच्या सुविधेवर आत्ताच मोठा ताण पडत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. यासाठी विमानतळावर 15 ते 20 बसेस आणि 20 ते 25 टॅक्सी तयार ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये परदेशातून येणाऱ्या आणि संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. मात्र, त्यावरचा ताण वाढत असल्यामुळे खासगी हॉटेलांना देखील पालिकेकडून आणि सरकारकडून क्वॉरंटाईन सुविधा पुरवण्यासाठी हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन करण्यात येत होतं. coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती अनेकांकडून आरोग्य विभागाच्या नियमांंचे उल्लंघन
राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 52 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यात सर्वाधिक पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचा समावेश आहे. यात बहुतांश लोक परदेशातून आलेले आहेत. त्यामुळे परदेशातून आलेल्या लोकांना 14 दिवस घरीच कॉरंटाईन (इतरांपासून अलग) करण्याच्या सूचना आहेत. मात्र, बरेचजण हे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासोबत इतरांनाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार आता होम कॉरंटाईन बंद करण्याची शक्यता आहे.
कस्तुरबा रुग्णालयात घुशी आणि मांजरींचा वावर? वकिलाचा आरोप
मुंबईसह राज्याभरात कोरोनानं थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. मात्र मुंबईतील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात अस्वच्छतेचं साम्रज्य असून इथं घुशी, मांजरींचा वावर असल्याचा आरोप करत एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच येथील स्वच्छतागृहातही कमालीची अस्वच्छता असल्याचे दाखवणारे काही फोटोही या आरोपांचा पुरावा म्हणून त्यांनी खंडपीठाला दाखवले. तसेच कस्तुरबाच्या क्वारंटाइन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना आरोग्यदायी आहारही मिळत नसल्याचा आरोप करताना जेवणाच्या ताटाचे काही फोटो आणि रुग्णालयाचा डाएट चार्टही त्यांनी दाखवला. मात्र, चार्ट पाहून तो प्रथमदर्शनी योग्यच असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत या अर्जावर सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement