एक्स्प्लोर

Coronavirus | मुंबई-पुण्यावरुन गावाकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची रेल्वे, बस स्थानकावरच तपासणी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्या-मुंबईत असलेले अनेक विद्यार्थी, नोकरदार आता गावाकडे परतत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये अशा प्रवाशांची रेल्वे, बस स्थानकांवरच तपासणी करण्यात येत आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य सरकारने मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी मुंबई, पुण्यात शिक्षण किंवा कामानिमित्त असलेले लोक आता मोठ्या प्रमाणात गावाकडे परतत आहे. यामुळे रेल्वे, बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यातून या विषाणूचा संसर्ग गावापर्यंत पोहचण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात रेल्वे आणि बस स्थानकांवर अशा प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. सोबतच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची देखील कसून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाप्रशासनाकडून विशेष पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह नागपूर शहरे अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी, नोकरदार आता गावाकडे परतू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यासह गावं देखील जागृत झाली आहे. अनेक जिल्ह्यात रेल्वे किंवा बसस्थानकावरच अशा प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. तर, काही गावात बाहेरुन आलेल्या प्रवाशांनी ग्रामपंचायतील कळवणे बंधनकारक केले आहे. Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार यवतमाळमध्ये परराज्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणी यवतमाळमध्ये इतर राज्यातून आलेल्यांची तपासणी करण्याकरीता विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तेलंगाणा तसेच इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याकरीता जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्टवर पथक गठीत करण्यात आले आहे. एका पथकात चार लोकांचा समावेश असून यात आरोग्य अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. अशी एकूण चार पथकाची स्थापना करण्यात आली आहे. बाहेर राज्यातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची सखोल चौकशी करणे, प्रवाशांची नोंदवही ठेवणे, विदेशातील प्रवासी असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाला कळविणे. प्रशासनातील अधिकारी यांनी अहवाल मागितल्यास सादर करणे, रोजचा अहवाल तहसील समितीला सादर करणे, प्रवाश्यांमध्ये कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांची आरोग्य तपासणी करून घेण्याबाबत आरोग्य यंत्रणेला कळविणे आदी कामे या पथकांकडून करण्यात येणार आहे. 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत 24 तास हे पथक चक्राकार पध्दतीने कार्यरत राहणार आहेत. Coronavirus | कनिका कपूरमुळे कोरोना थेट राष्ट्रपती भवनात? राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार कोरोना तपासणी चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पुण्याहून आळेल्या विद्यार्थ्यांची तपासणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी गावाकडे परतत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज पुण्याहून आलेल्या विशेष रेल्वेने हजारावर विद्यार्थी परतले. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत थर्मल स्क्रिनिंग आणि काही प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा प्रशासन, रेल्वे-आरोग्य यंत्रणा आणि मनपा यांचा पुढाकाराने ही तपासणी करण्यात आली आहे. पुण्यात अधिक धोका असल्यामुळे विद्यार्थी आता आपआपल्या गावात परतत आहे. Health Minister on #Corona | कोरोनाग्रस्तांचा आकडा 63, जनता कर्फ्यु पाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Embed widget